एक्स्प्लोर
मुंबई-दिल्लीत छापेमारी नाही सर्वेक्षण, आयकर विभागाची माहिती
नवी दिल्ली : आयकर विभागाने मुंबई, दिल्लीसह काही शहरांमध्ये छापेमारी केली नसून फक्त 8-10 ठिकाणांचं सर्वेक्षण केलं आहे, अशी माहिती मिळत आहे. छापेमारीचं वृत्त प्रसारित झाल्यानंतर महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरात आयकर विभागानं छापे टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती पीटीआयने दिली होती. मात्र त्यानंतर पीटीआयनेच नवीन ट्वीटमध्ये हे छापे नसून सर्वेक्षण असल्याचा खुलासा केला आहे.
https://twitter.com/PTI_News/status/796731377072734208
तुमच्या बँक अकाऊंटमधून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर आता आयकर विभागाची नजर आहे. कारण तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा केले की त्याची माहिती आयकर विभागाला मिळत आहे.
गुरुवार सकाळपासून ही सुविधा सुरु झाली आहे. त्यासाठी सर्व बँकांचं सर्व्हर आयटी विभागाला जोडण्यात आलं आहे. त्यामुळे कुणाच्या खात्यात किती रोख रक्कम जमा होते, याची माहिती तातडीनं मिळते. आयकर विभागाच्या वेबसाईटवर यासाठी नवी विंडो सुरु करण्यात आली आहे.
ग्राहकांकडून बँकांमध्ये भरली जाणारी रक्कम आणि त्यांच्याकडून वर्षभर बँकेत भरली जाणारी रक्कम यांचा ताळमेळ बसतो का, हे आयकर विभागाकडून तपासण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबरपासूनच या पडताळणीला सुरुवात झाली आहे. 50 दिवसांपर्यत ही पडताळणी सुरु राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement