भारत-पाक सीमेवर नाशिकच्या जवानाला वीरमरण
केशव सोमगीर गोसावी असं 29 वर्षीय शहीद जवानाचं नाव आहे. रविवारी दुपारी पाकिस्तान लष्कराकडून युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी झालेल्या चकमकीत केशव गोसावी यांना गोळी लागली.

अहमदनगर : दहशतवाद्यांशी लढताना नाशिकच्या जवानाला वीरमरण आलं आहे. केशव सोमगीर गोसावी असं 29 वर्षीय शहीद जवानाचं नाव आहे. रविवारी दुपारी पाकिस्तान लष्कराकडून युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी झालेल्या चकमकीत केशव गोसावी यांना गोळी लागली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरु असताना गोसावी यांचं निधन झालं.
गोसावी हे सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर गावचे रहिवासी आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर 11 नोव्हेंबरला पाकिस्तानकडून अंदाधुंत गोळीबार करण्यात आला. यामध्ये केशव गोसावी यांचा मृत्यू झाला. केशव गोसावी यांच्या पश्चात वडील आणि पत्नी अस परिवार आहे.
भारतीय सैनिकांनी चोख उत्तर देताना पाकिस्तानच्या चौक्यांना लक्ष्य केलं. राजौरी जिल्ह्यीतील सुंदरबनी सेक्टरमध्ये शनिवारी चकमकीत एक जवान शहीद झाला होता.
तर जम्मू काश्मीरच्या सांभा जिल्ह्यातील मावा राजपुरा परिसरात 21 वर्षीय रायफलमॅन वरुण कट्टल यांनाही वीरमरण आलं. त्यानंतर झालेल्या गोळारात दोन बीएसएफचे जवानही जखमी झाले. अशारीतीने तीन मागील तीन दिवसात तीन जवान शहीद झाले.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..






















