National Flag Of India: राष्ट्रध्वज म्हणजे देशाचे प्रतीक. ज्याबद्दल त्या देशातील लोकांमध्ये आदर आणि समर्पणाची भावना असते. राष्ट्रध्वज (National Flag) हा जगभरातील देशाची वेगळी ओळख दर्शवतो. आपला राष्ट्रध्वज (tiranga)देखील असाच खास आहे. आपला राष्ट्रध्वज केवळ शांतता आणि बंधुभावासाठी वर्तमान भारताचे प्राधान्य दर्शवत नाही, तर भारतीय संस्कृतीचा महान वारसा देखील जगासमोर ठेवतो. जगातील अनेक देशांचे ध्वज धार्मिक आधारावर बनवले गेले आहेत मात्र भारताचा राष्ट्रध्वज विविधतेत एकता दर्शवतो.
22 जुलै 1947 रोजी भारताचा ध्वज स्वीकारण्यात आला
22 जुलै 1947 रोजी भारताचा ध्वज स्वीकारण्यात आला. घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने 22 जुलै 1947 ला या ठरावाला मंंजुरी दिली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकविण्यात आला. हा राष्ट्रीय ध्वज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकविण्यात आला.
राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास :
आपल्या भारतीय झेंड्यात तीन रंग प्रामुख्याने आहेत. भारतीय ध्वज संहितेनुसार, भारतीय ध्वजाची रुंदी:उंची गुणोत्तर 3:2 आहे. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, आणि पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असा बोध या अशोकचक्रातून होतो.
कायद्याने, हा ध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारचे हात सूती कापडाचा किंवा रेशीमचा असावा.यासाठी महात्मा गांधी यांनी लोकप्रिय केलेली खादी वापरली जाते.ध्वज निर्मितीची प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयद्वारे ठरवली जाते. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे. तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो. 2009 पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होता.
इतर महत्वाच्या बातम्या
- PM Narendra Modi : इतिहासात आजचा दिवस विशेष महत्त्वाचा, 'हर घर तिरंगा' मोहिमेला बळ देण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन
- India : इतिहासात आजचा दिवस खास; 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तिरंग्याचा स्वीकार; काय आहे इतिहास?