(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कधीही युद्ध करण्याची गरज भासली तर...' एनसीसी कॅम्पमध्ये राजनाथ सिंह म्हणाले...
Rajnath Singh In NCC Camp : प्रजासत्ताक दिनापूर्वी राजनाथ सिंह यांनी आज दिल्ली कॅंट भागातील एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिराला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कधीही युद्ध करण्याची गरज भासली तर संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल.
Rajnath Singh In NCC Camp : "कधीही युद्ध करण्याची गरज भासली तर संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल." असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh ) यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनापूर्वी राजनाथ सिंह यांनी आज दिल्ली कॅंट भागातील एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिराला ( NCC Camp ) भेट दिली. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी एनसीसी कॅडेट्सना संरक्षण मंत्री पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले. यावेळी एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना म्हणाले की, युद्धावेळी देशातील जनता सैनिकांच्या पाठिशी असेल.
राजनाथ सिंह (Rajnath Singh ) म्हणाले, "प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षा परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाला तयार करण्यास सरकार कोणतीही कसर सोडत नाही. यापूर्वी भारताने आपल्या शत्रूंना पराभूत केले आणि अनेक युद्धे जिंकली आहेत. हे एकीचे फळ आहे. सशस्त्र दल सर्व प्रकारच्या धोक्यांपासून देशाचे रक्षण करत असताना, शास्त्रज्ञ, अभियंते, नागरी अधिकारी आणि इतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. कधीही युद्ध लढण्याची गरज भासल्यास संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल. भारताने यापूर्वी आपल्या शत्रूंना पराभूत केले आहे आणि अनेक युद्धे जिंकली आहेत."
राजनाथ सिंह यांनी तरुणांना ‘वापरा आणि फेका’ या मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. "प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समाज आणि पर्यावरणाला या प्रथेचा सर्वाधिक त्रास होतो. बदलत्या काळानुसार स्वत:ला घडवण्याच्या गरजेवरही संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षेच्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाला तयार करण्यासाठी सरकारकडून कोणतीही कसर सोडली जात नाही."
"कालानुरूप बदल करणे आवश्यक असले तरी देशाच्या गौरवशाली भूतकाळाशी जोडलेले राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये रुजलेला सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. ज्ञान संपादन करण्यावर आणि पैसे कमावण्यावर जितके लक्ष दिले तितकेच चारित्र्य निर्माण करण्यावर लक्ष देली पाहिजे. कठोर परिश्रम, समर्पण आणि मूल्यांच्या जोरावर कॅडेट्स यशाच्या शिखरावर पोहोचतील आणि देशाचा गौरव करतील, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी एनसीसीचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या