एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kulbhushan Jadhav | कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निकाल देणार
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या न्यायालयाने एप्रिल 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने दाद मागितल्यावर 18 मे 2017 रोजी कूलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती आली.
हेग (नेदरलॅण्ड्स) : हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलॅण्ड्समधील आंतरराष्ट्रीय कोर्ट आज निर्णय देणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता हा निर्णय येणार आहे. या निकालाकडे भारत आणि पाकिस्तानचं लक्ष लागलं आहे.
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात कैद आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्याने 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपात बलुचिस्तानमधून अटक केली होती, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र भारताने वारंवार हा दावा फेटाळला आहे.
कुलभूषण जाधव निवृत्ती घेऊन बिझनेच्या निमित्ताने इराणला गेले होते. तिथे पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं, असं भारताचं म्हणणं आहे.
फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. याविरोधात भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. पाकिस्तानने जाधव यांना काऊन्सलर न दिल्याचा आरोप भारताने केला हाता. भारताने पाकिस्तानी सैन्याच्या जाधव यांच्याविरोधातील खटल्याला आव्हानही दिलं होतं. ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडली होती.
जाधव यांच्या फाशीला स्थगिती
यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी पुढील कोणताही निर्णय येईपर्यंत पाकिस्तानने कारवाई करु नये, असं सांगत कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 ते 21 फेब्रुवारी 2019 दरम्यान चार दिवस सुनावणी केली होती. यावेळी भारत आणि पाकिस्तानने आपापला युक्तिवाद मांडला होता. आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्ट आपला निर्णय देणार आहे.
आई आणि पत्नीची भेट
डिसेंबर 2017 च्या शेवटच्या आठवड्यात कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईने त्यांची भेट घेतली होती. परंतु पाकिस्तानने भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांवर भेटीसाठी बंदी घातली होती. भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने दावा केला होता की, त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि ते रोबोप्रमाणे बोलत होते. भेटीच्या वेळी त्यांच्याच काचेची भिंत होतं. यावर भारताने आक्षेप नोंदवला होता.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
'रॉ'चे हेर असल्याचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती.
जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.
'माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,' असं त्यांचे वडील म्हणाले होते.
संबंधित बातम्या
कुलभूषण जाधव प्रकरणी आयसीजेमध्ये भारताकडून पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश
कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement