एक्स्प्लोर
IAS शाह फैसल यांचा सेवेतून राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार!
फैजल 2010 च्या बॅचचे आयएएस टॉपर आहेत. आयएएस परीक्षेत टॉप करणारे ते काश्मीरचे पहिले व्यक्ती होते. आयएएस होण्याआधी शाह फैजल डॉक्टर होते.

जम्मू काश्मीर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिला काश्मिरी शाह फैजल यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. आता ते राजकारणात प्रवेश करणार आहेत. काश्मीरमधून ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत 35 वर्षीय फैजलने फेसबुकवर एका पोस्टरद्वारे राजीनाम्याचं कारण सांगितलं आहे. "काश्मीर खोऱ्यात सातत्याने लोक मरत आहेत आणि सरकार काहीही करत नाही. 'जम्मू कश्मीर राज्याच्या विशेष ओळखीवर कपटाने केलेला हल्ला तसंच भारतात अति-राष्ट्रवादाच्या नावावर असहिष्णुता तसंच द्वेषाची वाढती संस्कृती याविरोधात राजीनामा देत आहे," असं फैजल यांने लिहिलं आहे. ओमर अब्दुल्लांकडून स्वागत फैजलच्या या निर्णयाचं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे स्वागत केलं आहे. "शाह यांचा राजीनामा प्रशासनासाठी नुकसानीचं आहे पण राजकारणासाठी फायदेशीर आहे," असं अब्दुल्ला म्हणाले.
नुकताच भारतात परतला फैजल शाह फैजल नुकताच भारतात परतले आहेत. ते हॉवर्ड केनेडी स्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले होते. मागील आठवड्यातच ते भारतात परतले. यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आधी डॉक्टर मग आयएएस फैजल 2010 च्या बॅचचे आयएएस टॉपर आहेत. आयएएस परीक्षेत टॉप करणारे ते काश्मीरचे पहिले व्यक्ती होते. आयएएस होण्याआधी शाह फैजल डॉक्टर होते. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि अव्वल क्रमांक पटकावला. आता ते राजकारणात प्रवेश करत आहेत. शाह फैजल शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन स्वत:च्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे. ट्वीटवरुन वाद शाह फैजल आपल्या ट्वीटमुळे ते कायम चर्चेत असत. ज्यापैकी एका ट्वीटमुळे त्यांच्यावर कारवाईही झाली होती. फजलने एक ट्वीट किया था जिसमें उन्होंने लिखा था- ‘पितृसत्ता + लोकसंख्या + निरक्षरता + दारु + पॉर्न + टेक्नॉलॉजी + अराजकता = रेपिस्तान! असं ट्वीट त्याने केलं होतं. यानंतर त्याच्या अडचणी वाढल्या, त्याला नोटीसही हटवण्यात आली होती. परंतु नंतर हे प्रकरण थंड पडलं.The bureaucracy’s loss is politics’ gain. Welcome to the fold @shahfaesal. https://t.co/955C4m5T6V
— Omar Abdullah (@OmarAbdullah) January 9, 2019
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























