एक्स्प्लोर
Advertisement
27 तासांनंतर पी. चिदंबरम माध्यमांसमोर, म्हणाले माझ्यावरील आरोप खोटे
माझ्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल नाही, आयएनएक्स मीडियाप्रकरणी मी कधीही आरोपी नव्हतो, असा दावा काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.
नवी दिल्ली : माझ्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल नाही, आयएनएक्स मीडियाप्रकरणी मी कधीही आरोपी नव्हतो, असा दावा काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. आयएनएक्सप्रकरणी सीबीआयच्या रडारवर असलेले पी. चिदंबरम गेल्या 27 तासांपासून बेपत्ता होते. ते थेट आज रात्री माध्यमांसमोर आले. त्यांनी रात्री 8.15 वाजता नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे खंडन केले.
कुठल्याच एफआयआरमध्ये कुटुबाचं आणि आपलं नाव नसल्याचेही चिदंबरम यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या 27 तासांपासून कुठे गायब होता? असा सवाल माध्यमांनी चिदंबरम यांना विचारला असता, ते म्हणाले की, मागील 27 तासांपासून मी वकिलांसोबत लढण्याची पूर्वतयारी करत होतो.
दरम्यान पी. चिदंबरम पत्रकारांसमोर येताच सीबीआयचे पथक चिदंबरम यांना अटक करण्यासाठी निघालं आहे. मात्र त्याआधीच चिदंबरम निघून गेल्यानं सीबीआयला त्यांना अटक करता आली नाही. पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम त्यांच्या मागावर आहे. सध्या चिदंबरम त्यांच्या घरी असून सीबीआय थोड्याच वेळात त्यांच्या घरी त्यांना अटक करणार आहे. त्यामुळे चिदंबरम पुढे आणि सीबीआय मागे मागे असा पाठशिवणीचा खेळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
#PChidambaram at AICC headquarters: I believe that the foundation of a democracy is liberty, most precious article of the constitution is Article 21 that guarantees life and liberty. If I'm asked to choose between life and liberty, I will choose liberty. pic.twitter.com/ibGWzatADH
— ANI (@ANI) August 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
Advertisement