एक्स्प्लोर

हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला आता सर्व्हिस चार्ज आकारता येणार नाही, सरकारने जारी केले नवीन नियम

Hotels And Restaurant Service Charge: तुम्ही जर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नेहमी जेवायला जात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Hotels And Restaurant Service Charge: तुम्ही जर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नेहमी जेवायला जात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने सोमवारी जाहीर केले की, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवस्थापनाला यापुढे सर्व्हिस चार्ज (Service Charge) आकारता येणार  नाही. CCPA ने रेस्टॉरंटमधील फूड बिलामध्ये आपोआप जोडल्या जाणाऱ्या सर्व्हिस चार्जवर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर या आदेशानंतरही जर हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सर्व्हिस चार्ज वसूल केला जात असेल तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता, असे सीसीपीएने म्हटले आहे.

गेल्या काही काळापासून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटकडून आकारल्या जाणाऱ्या सर्व्हिस चार्जवरून सातत्याने वाद होत आहेत. वाढत्या तक्रारींदरम्यान, CCPA ने सर्व्हिस चार्जवर बंदी घालणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वात असे म्हटले आहे की, "कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट आपोआप किंवा डीफॉल्टनुसार बिलामध्ये सर्व्हिस चार्ज जोडू शकत नाही." सेवा शुल्क इतर कोणत्याही नावाने वसूल करू नये, असेही त्यात नमूद केले आहे.

सर्व्हिस चार्ज भरण्याची सक्ती करता येणार नाही

कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सर्व्हिस चार्ज भरण्यास सक्ती करू शकत नाही. सर्व्हिस चार्ज ऐच्छिक आणि वैकल्पिक असल्याचे त्यांना ग्राहकाला स्पष्टपणे सांगावे लागेल. याचा अर्थ ग्राहक एकतर सर्व्हिस चार्ज भरू शकतो किंवा तो भरण्यास नकार देऊ शकतो. सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांच्या प्रवेशावर कोणतेही बंधन नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात पुढे म्हटले आहे. तसेच सर्व्हिस चार्ज फूड बिलात जोडून आणि एकूण रकमेवर जीएसटी लागू करून वसूल करता येणार नाही.

तुम्ही हेल्पलाइनवर तक्रार करू शकता

एखाद्या ग्राहकाला हॉटेल किंवा रेस्टॉरंट मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून सर्व्हिस चार्ज आकारत असल्याचे आढळल्यास, तो रेस्टॉरंटला बिलाच्या रकमेतून काढून टाकण्याची विनंती करू शकतो. ग्राहक इच्छित असल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर तक्रार नोंदवू शकतात. यासाठी तुम्हाला 1915 वर कॉल करावा लागेल. यासोबतच तुम्ही ग्राहक आयोगाकडे तक्रारही करू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget