(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक ! धुळवडीत फुगा मारल्यानंतर रिक्षा उलटली, प्रवासी जखमी; पाहा व्हिडिओ
Holi Accident Video : धुळवडीच्या दिवशी रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर फुगा मारल्यानंतर चालकाचे नियंत्रण गेल्याने रिक्षा उलटली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Holi Accident Viral Video : देशभरात कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर यंदा होळी आणि धूळवडीचा सण अनेक ठिकाणी कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा झाला. निर्बंधाशिवाय सण साजरा होत असल्याने अनेकांच्या आनंदाला उधाण आले होते. मात्र, काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागले. धुळवडीत रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर फुगा मारल्याने रिक्षा उलटली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशमधील बागपत येथील ही घटना आहे. शनिवारी ही घटना घडली. काही मुलांकडून रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर, दुचाकीस्वारांवर पाण्याने भरलेले फुगे मारले जात होते. या दरम्यान, प्रवासी असलेली रिक्षा जात होती. या रिक्षावरदेखील दोन मुलांनी फुगा मारला. फुगा मारल्यानंतर काही क्षणांतच रिक्षा उलटली.
A speeding auto met with a grisly road accident after being struck with a water balloon thrown by a Holi reveller in western Uttar Pradesh's Baghpat on Saturday.
— (فیض) Faiz (@atfaizzz) March 19, 2022
Road Jihad or Auto Jihad what will you call this??? pic.twitter.com/5fpuZuCo3o
या रिक्षात तीनपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे व्हिडिओत दिसत होते. फुगा मारल्यानंतर रिक्षा चालकाने नियंत्रण गमावले आणि रिक्षा उलटली असावी. रिक्षा उलटल्यानंतर झालेल्या अपघातात किती प्रवासी जखमी झालेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जयपूरमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार
होळीच्या मुहूर्तावर जयपूरला भेट देण्यासाठी पर्यटक व्हिसावर आलेल्या परदेशी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जयपूर शहरातील सिंधीकॅम्प पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे आयुर्वेदिक मसाज करणाऱ्या तरुणाने नेदरलँडच्या एका तरुणीसोबत मसाज करण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याचं उघड झालंय. पीडितेने कुटुंबीयांना आणि भाड्याने राहत असलेल्या घरमालकाला या घटनेची माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: