Asian Games | भारतात 1951 साली पहिल्यांदा आशियाई स्पर्धेचं आयोजन, 11 देशांच्या 489 खेळाडूंनी घेतला होता भाग
भारतात 4 मार्च 1951 साली पहिल्यांदा आशियाई स्पर्धेचं (Asian Games) आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये 11 देशांतील 489 खेळाडूंनी भाग घेतला होता.
नवी दिल्ली: भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशात पहिल्यांदाच देशात 4 मार्च ते 11 मार्च 1952 या दरम्यान आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. या खेळांचं आयोजन करणे म्हणजे आशियाला आणि जगाला आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करण्यासारखं होतं. त्यामुळे भारताने या स्पर्धेंचं आयोजन केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करुन दाखवली.
नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेली आशियाई खेळांची ही पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेचं आयोजन 1950 सालीच करण्यात येणार होतं पण तयारीसाठी आवश्यक वेळ न मिळाल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. नवी दिल्लीत पार पडलेल्या या स्पर्धेत आशियातील 11 देशांतील 489 खेळाडूंनी भाग घेतला होता.
आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात मराठमोळे पैलवान, अभिजीत कटके आणि सोनबा गोंगाणेची निवड
पहिल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत आठ खेळांना एकूण 57 स्पर्धांमध्ये विभाजीत करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जपानने सर्वाधिक गोल्ड मेडल जिंकले होते. जपानने 24 गोल्ड मेडल आणि एकूण 60 पदकांची कमाई केली होती आणि यादीत पहिले स्थान पटकावलं होतं. यजमान भारताने या यादीत 15 गोल्डसह एकूण 51 पदकांवर आपलं नाव कोरलं होतं आणि या यादीत दुसरं स्थान पटकावलं होतं. या पहिल्या आशियाई खेळाचे आयोजन करणे आणि ती स्पर्धा यशस्वी करणे या घटनेनं भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.
आगामी आशियाई स्पर्धा ही 2022 साली जपानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘Road to Asian Games’ या मोहीमेची घोषणा करण्यात आली आहे. जपानमधील हॅन्गझो येथून 2022 साली या मोहीमेला सुरुवात करण्यात येणार आहे.