Indian Air Force : पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी! स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमान वायू दलात दाखल
LCA Tejas in Indian Air Force : भारतीय वायुसेना प्रमुख (IAF) यांनी बंगळुरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून एलसीए तेजस ट्विन-सीटर ट्रेनर विमान अधिकृतरित्या स्वीकारलं.
HAL Hands First LCA Tejas to IAF : भारतीय वायू दल (Indian Air Force) मध्ये पहिलं एलसीए तेजस लढाऊ विमान (LCA Tejas Aircraft) दाखल झालं आहे. भारतीय वायू दलात नवा योद्धा सामील झाल्याने आता पाकिस्तान आणि चीनला धडकी भरणार आहे. एलसीए तेजस लढाऊ विमान दोन सीटर (LCA Tejas twin-seater) विमान आहे. भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी बंगळुरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे सीएमडी सीबी अनंतकृष्णन यांच्याकडून एलसीए तेजस ट्विन-सीटर ट्रेनर विमान अधिकृतरित्यास्वीकारले. यामुळे वायू दलाची ताकद आणखी वाढली आहे.
पाकिस्तान विरोधात भारताचा नवा 'योद्धा'
LCA तेजस म्हणजे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस (LCA Tejas) हे एक हलक्या वजनाचे फायटर जेट आहे. LCA तेजस ट्वीन-सीटर (LCA Tejas Two Seater Aircraft) हे हलके वजनाचे सर्व हवामानातील मल्टी-रोल 4.5 जनरेशनचं लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने सांगितले की, ट्विन-सीटर वेरिएंटमध्ये IAF मधील आवश्यक सर्व क्षमता आहेत.
स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमान वायू दलात दाखल
In a formal ceremony, Hindustan Aeronautics Ltd @HALHQBLR handed over the first trainer version of the LCA Tejas to CAS Air Chief Marshal VR Chaudhari in the presence of Hon'ble Raksha Rajya Mantri Shri Ajay Bhatt.#AtmanirbharBharat #IndianAirForce pic.twitter.com/UFXTGnRtxc
— Indian Air Force (@IAF_MCC) October 4, 2023
LCA तेजस विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बुधवारी पहिलं LCA तेजस ट्विन सीटर विमान भारतीय हवाई दलाला अधिकृतरित्या सुपूर्द केलं. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्यासह इतरही अनेक अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात LCA ट्विन-सीटर विमानाचं अनावरण करण्यात आलं. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने म्हटले आहे की, LCA तेजस ट्विन सीटर प्रकारात IAF च्या प्रशिक्षणासाठी सर्व आवश्यकता आणि सर्व क्षमतेसह शत्रूविरोधात लढेल.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Hindustan Aeronautics Limited (HAL) to hand over Light Combat Aircraft (LCA) twin-seater trainer version aircraft to the Indian Air Force (IAF) pic.twitter.com/cKT2F0hpZY
— ANI (@ANI) October 4, 2023
LCA तेजस विमानाची खासियत
एलसीए तेजस ट्विन सीटर हे हलके वजनाचे लढाऊ विमान आहे. LCA तेजस लढाऊ विमाने कोणत्याही वातावरणा शत्रूविरोधात लढण्यास सक्षम आहे. या लढाऊ विमानामध्ये आधुनिक संकल्पना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे, जे विमानाला उंच आकाशात स्थिर ठेवण्यात मदत करते. यामध्ये क्वाड्रप्लेक्स फ्लाय-बाय-वायर फ्लाइट कंट्रोल, बेफिकीर युक्ती, प्रगत काचेचे कॉकपिट, एकात्मिक डिजिटल एव्हीओनिक्स सिस्टम आणि एअरफ्रेमसाठी प्रगत साहित्य असल्याची माहितची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने दिली आहे.