एक्स्प्लोर
नमाज अदा करणाऱ्या सहकाऱ्याला हिंदू जवानाचा कडेकोट पहारा
सीआरपीएफचा मुस्लिम धर्मीय जवान नमाज अदा करताना हिंदू धर्मीय ऑफिसर त्याच्या शेजारी सशस्त्र उभा राहिल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

मुंबई : सैन्यात भरती झालेला प्रत्येक जवान जात-धर्म या पलिकडे देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावतो. मात्र मुस्लिम धर्मीय जवान नमाज अदा करताना सीआरपीएफचा हिंदू धर्मीय ऑफिसर त्याच्या शेजारी सशस्त्र उभा राहिल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. 'शांतीसाठी सशस्त्र बंधूत्व' (Brothers-in-arms for peace) अशा कॅप्शनसह हा फोटो सीआरपीएफच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर शेअर करण्यात आला आहे. ऑन ड्युटी असताना नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या रक्षणार्थ दुसरा ऑफिसर उभा आहे. काश्मिरचं खोरं धार्मिकतेच्या नावाखाली सतत धगधगतं राहिलं आहे. त्यातच सीआरपीएफच्या जवानांचा हा अनोखा बंधुत्ववाद सोशल मीडियावर अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे. https://twitter.com/crpf_srinagar/status/891268906643574784
आणखी वाचा























