एक्स्प्लोर

Hathras Case : पीडित परिवाराचे सरकारला पाच सवाल, प्रियांका गांधींचं ट्वीट, डीएमला कोण वाचवतंय?

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी सायंकाळी हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेटी घेतली.या भेटीनंतर या परिवारानं उपस्थित केलेले पाच प्रश्न प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला विचारले आहेत.

लखनौ : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी सायंकाळी हाथरसमध्ये  पीडितेच्या कुटुंबियांची भेटी घेतली. राहुल आणि प्रियंकाने पीडितेचा भाऊ, वडील आणि आईशी बंद खोलीत सुमारे एक तास संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही त्यांच्यासमवेत तेथे होते. या भेटीनंतर या परिवारानं उपस्थित केलेले पाच प्रश्न प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला विचारले आहेत.

काय आहेत पीडित परिवाराचे  प्रश्न 1.सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे

2.हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये

3.आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?

4.आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?

5.आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?

डीएमला कोण वाचवत आहे? - प्रियांकांचा सवाल

पीडित परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत सर्वात वाईट वागणूक डीएमनी केली आहे. त्यांना कोण वाचवत आहे? त्यांना तात्काळ निलंबित करावं. आणि सर्व प्रकरणात त्यांच्या भूमिकेची देखील चौकशी करावी. जर पीडित परिवार न्यायिक चौकशीची मागणी करत असेल तर सीबीआय चौकशीची बोंब मारत एसआयटी चौकशी सुरु आहे, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय. यूपी सरकार झोपेतून जागे झाले असेल तर पीडित परिवाराची मागणी त्यांनी पूर्ण करावी, असंही प्रियांका यांनी म्हटलं आहे.

पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार - प्रियांका गांधी पीडित कुटुंबाशी झालेल्या भेटीदरम्यान प्रियंका गांधी यांनी पीडित मुलीच्या आईला मिठी मारली आणि त्यांचं दु:ख वाटण्याचा प्रयत्न केला. पीडित कुटुंबाच्या घराबाहेर सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चर्चेवेळी राहुल यांनी पीडितेच्या कुटुंबाला विचारले की तुम्हाला न्याय मिळेल असे तुम्हाला वाटते का? त्यावर तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, असे कुटुंबीय म्हणाले,

चर्चेनंतर राहुल गांधी म्हणाले, "आम्ही पीडित कुटुंबासमवेत आहोत. सरकार त्यांना घाबरवत आहे, त्यांना धमकावत आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यूपी सरकार सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. कुटुंबाला धमकावून त्यांची सही घेतली आहे. तर पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "पीडितेच्या कुटुंबाला न्यायालयीन चौकशी हवी आहे. कुटुंबाला मुलीचा चेहरादेखील दिसू शकला नाही. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार आहे."

 प्रियांका गांधींशी गैरवर्तन उत्तर प्रदेश पोलिसांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे.  यूपी पोलिसांनी प्रियांका गांधींशी गैरवर्तन केल्याचा एक फोटो समोर आला आहे. कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. दिल्ली आणि नोएडा प्लायओव्हरवर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केली. त्यावेळी प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केली. यावेळी एक पोलीस प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचे कपडे खेचताना दिसत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृत्याबद्दल देशभर पडसाद उमटू लागले आहेत.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 24 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special ReportAkshay Shinde Encounter : नराधम अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, आरोपांची फायरिंग  Special ReportBadlapur Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने, शवविच्छेदन अहवालातून उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Amit Shah :  'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Embed widget