एक्स्प्लोर

Jyoti Malhotra : हेरगिरीचा आरोप असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पहिला सर्जिकल स्ट्राईक; कारवाईची कुऱ्हाड कोसळली

तपासात असे दिसून आले की ती 2023 मध्ये कमिशन एजंट्सद्वारे व्हिसा मिळवल्यानंतर पाकिस्तानला गेली होती. तिथे तिची भेट पाकिस्तानी उच्चायोगाचे अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी झाली.

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून ती पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. आता ज्योतीला पहिला दणका देण्यात आला असून  इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलं आहे. ज्योतीच्या अकाउंटला भेट दिल्यास 'माफ करा हे पेज उपलब्ध नाही' असे लिहिलं आहे. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की ज्योतीने तिच्या व्हिडिओंद्वारे पाकिस्तानसोबत अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा सहभाग असल्याचा संशय आहे. सध्या पोलिस तपासात गुंतले आहेत.

ज्योतीचे इंस्टाग्रामवर 1.31 लाख फॉलोअर्स आहेत

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या यूट्यूब चॅनलचे 3.77 लाख सबस्क्राइबर आहेत आणि तिचे इन्स्टाग्रामवर 1.31 लाख फॉलोअर्स आहेत. तपासात असे दिसून आले की ती 2023 मध्ये कमिशन एजंट्सद्वारे व्हिसा मिळवल्यानंतर पाकिस्तानला गेली होती. तिथे तिची भेट पाकिस्तानी उच्चायोगाचे अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी झाली, ज्याला अलीकडेच भारतातून हाकलून लावण्यात आले आहे.

तिचा खर्च तिच्या उत्पन्नापेक्षा जास्त 

ज्योतीचे 'ट्रॅव्हल विथ जो' हे इन्स्टाग्राम अकाउंट उघडल्यावर, अकाउंट सस्पेन्ड  केलेले दिसते. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर, तिची बराच काळ चौकशी केली जात आहे. ज्योती मल्होत्रा परदेशात प्रवास करत असे आणि आलिशान हॉटेल्समध्ये राहत असे, जे प्रायोजित होते. तपास यंत्रणांनी तपासलेल्या नोंदींवरून असे दिसून आले आहे की तिचा खर्च तिच्या उत्पन्नापेक्षा जास्त होता.

हिसारच्या पोलिस अधीक्षकांनी कोणती माहिती दिली? 

ज्योती मल्होत्राने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधी अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ती सुमारे 12 दिवसांपासून पाकिस्तानात होती. पहलगाम हल्ल्यानंतर ती लाईव्ह आली आणि हसताना दिसली. या प्रकरणात, हिसारचे पोलिस अधीक्षक (एसपी) शशांक कुमार सावन यांनी माध्यमांना सांगितले की, आधुनिक युद्ध आता सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही. पाकिस्तानी गुप्तचर एजंट सोशल मीडियावर प्रभावशाली लोकांना भरती करून त्यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ज्योतीला हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीतून अटक करण्यात आली. ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तान आणि एकदा चीनला प्रवास केला होता. ती पाकिस्तानी गुप्तचर एजंटांच्या संपर्कात होती.

युट्यूबर ज्योती मल्होत्राचे चीनशी काय संबंध आहे? 

हरियाणाची रहिवासी युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था (पीआयओ) तिला भारताविरुद्ध तयार करत होत्या, जेणेकरून तिचा योग्य वेळी वापर करता येईल. पोलिसांनी असेही म्हटले आहे की ज्योतीने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली होती, ज्यामध्ये पहलगाम हल्ल्यापूर्वीचाही समावेश होता. या काळात तिने चीनलाही भेट दिली होती. पत्रकार परिषदेत एसपी शशांक कुमार सावन म्हणाले, "केंद्रीय तपास संस्थांनी हरियाणा पोलिसांना सांगितले आहे की पीआयओ सॉफ्ट नॅरेटिव्ह्जचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लोकांना भरती करत आहे." शुक्रवारी (16 मे 2025) अटक करण्यात आलेल्या ज्योतीला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget