गेल्या निवडणुकीत किंगमेकर, यंदा पक्षाचा टांगा पलटी; दुष्यंत चौटालांची अवस्था ना घरका ना घाट का
Haryana Election Results: गेल्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेला दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष सध्या पिछाडीवर आहे.
Haryana Election Results: हरियाणात निवडणुकीच्या मैदानात असलेल्या राजकीय घराण्यातील उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष (जेजेपी) सध्या पिछाडीवर आहे. निवडणूक आयोगाने 11 वाजेपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार स्वत: दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) आणि त्यांचे लहान भाऊ दिग्विजय चौटाला सध्या पिछाडीवर आहेत.
दुष्यंत चौटाला हे उचाना कलान मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ते चौथ्या क्रमांकावर आहेत. गेल्या निवडणुकीत जेजेपी हा किंग मेकर पक्ष ठरला होता. 2019 मध्ये राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन झाले आणि ते उपमुख्यमंत्री झाले. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार प्रेम लता यांचा 47,452 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता, तेव्हा त्यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा दुष्यंत चौटाला पिछाडीवर आहे. ते 11 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 2420 मतांसह ते सहाव्या स्थानावर आहेत. त्याचवेळी या जागेवरून INLD पक्षाचे 14392 ब्रिजेंद्र सिंह आघाडीवर आहेत.
दुष्यंत चौटाला यांचे भाऊ दिग्विजय देखील पिछडीवर
दुष्यंत चौटाला यांचे भाऊ दिग्विजय चौटाला हे हबवालीतून निवडणूक लढवत आहे. सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. डबवालीतून काँग्रेसचे अमित सिहाग सध्या आघाडीवर आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर INLD पक्षाचे आदित्य देवीलाल आहेत. तर भाजपाचे बलदेव सिंह मागेंआना चौथ्या आणि आपचे कुलदीप सिंह हे पाचव्या क्रमांकावर आहेत.
गेल्या निवडणुकीत किंगमेकर, यंदा पक्षाचा टांगा पलटी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाने 10 जागा जिंकल्या होत्या. त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे जेजेपीलाही सरकारमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मनोहर लाल खट्टर यांच्या सरकारमध्ये दुष्यंत उपमुख्यमंत्री झाले. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेजेपी आणि भाजप वेगळे झाले. यानंतर दुष्यंत चौटाला यांचे आमदारही त्यांना सोडून गेले. निवडणुकीत जेजेपीचे फक्त तीन आमदार उरले होते.
जाटांची नाराजी भोवणार?
हरियाणात जाट मतांचे प्राबल्य बघता कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारविरोधात झालेल्या संघर्षाच्या वेळी दुष्यंत चौटाला यांनी भाजप सरकारची साथ सोडली नव्हती. ही गोष्ट हरियाणातील शेतकरी बहुल जाट वर्गाला खटकली होती. परिणामी निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांना ठिकठिकाणी जाटांकडून रोष पत्करावा लागत असल्याचं दिसून येतं. मात्र आपण उपमुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते, असं चौटाला प्रचार सभांमध्ये सांगत होते.
हे ही वाचा :