एक्स्प्लोर

दिवसाढवळ्या काँग्रेस प्रवक्त्याची गोळ्या झाडून हत्या

हरियाणामधील फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची काही अज्ञातांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली आहे.

चंदीगड : हरियाणामधील फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची काही अज्ञातांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली आहे. त्यांच्यावर 8 ते 10 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. दरम्यान स्थानिकांनी जखमी झालेल्या विकास चौधरी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांच्या हत्येनंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी खट्टर सरकारला लक्ष्य केले आहे. हरियाणामधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. विकास चौधरी फरिदाबादमधील सेक्टर 9 मधील पीएचसी जिममध्ये दररोज व्यायाम करण्यासाठी जात होते. आज (गुरुवार) जिममधून व्यायाम करुन चौधरी बाहेर पडले. ते त्यांच्या गाडीत बसत असताना काही लोक तिथे आले. त्यांनी चौधरी यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. दरम्यान तपासावेळी पोलिसांना घटनास्थळावर 12 गोळ्यांच्या कॅप्स सापडल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करुन म्हटले आहे की, भाजपच्या राज्यात हरियाणामध्ये गुंडाराज आणि झुंडशाही वाढली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा चुराडा झाला आहे. गुंड, समाजकंटकांचा सर्वत्र बोलबाला आहे. या संपूर्ण परिस्थितीला खट्टर सरकार जबाबदार आहे. सुरजेवाला यांनी विकास चौधरींच्या हत्येचा निश्पक्ष तपास केला जावा, असी मागणी मांडली आहे. तसेच भाजप सरकारकडे मागणी मांडली आहे की, चौधरी यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा द्यावी.

महत्त्वाच्या बातम्या

Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांसोबत तब्बल साडेतीन तास बैठक, मंत्र्यांना दिल्या महत्वाच्या सूचना, नेमकी काय झाली चर्चा? 
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget