एक्स्प्लोर

मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण: हार्दिक पटेल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हार्दिक पटेलने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी हार्दिक पटेलने विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

मुंबई: गेल्या तीन वर्षात माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण कोणता असेल, तर तो म्हणजे ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना नमन करणं होय, असं पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने सांगितलं. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हार्दिक पटेलने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी हार्दिक पटेलने विविध मुद्द्यांना स्पर्श केला. गेल्या तीन वर्षातील हार्दिक पटेलच्या आयुष्यात सर्वोच्च क्षण कोणता, असा प्रश्न हार्दिक पटेलला विचारण्यात आला. त्यावर हार्दिक पटेल म्हणाला, “ ‘मातोश्री’वर जाऊन  बाळासाहेब ठाकरेंना नमन करणं, हा सर्वोच्च क्षण होता”. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाणार का असाही प्रश्न हार्दिकला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मातोश्री परिवाराशी माझे चांगले संबंध आहेत, याचा अर्थ मी त्यांच्यासोबत जाणार असा नाही”. मराठा आरक्षणाला पाठिंबा महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबतही हार्दिक पटेलने मत व्यक्त केलं. “मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे.  मराठा समाजातील 5-50 लोक श्रीमंत आहेत, त्यांची मुंबईत घरं आहेत, याचा अर्थ सगळे मराठे श्रीमंत आहेत असा होत नाही. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था पाहा, त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मराठा समाजातही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. त्यामुळे रोजगार आणि शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी होत आहे. त्यामुळेच माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे”, असं हार्दिकने नमूद केलं. जिसकी संख्यादारी, उतनी भागीदारी ‘जिसकी संख्यादारी, उतनी भागीदारी’, या तत्वानुसार जाट, गुर्जर, पटेल आणि मराठा यांना आरक्षण मिळायलाच हवं, असं हार्दिक पटेल म्हणाला. जाट, गुर्जर, पटेल आणि मराठा सर्व एकत्र येऊन चांगलं काम करु, त्यासाठी मी महाराष्ट्रात पण येणार आणि मराठा आंदोलनात सहभागी होणार, असं हार्दिक पटेलने सांगितलं. जनतेला त्यांचे अधिकार मिळायला हवेत जनतेला त्यांचे अधिकार मिळायला हवेत, त्यासाठीच जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळेच आरक्षणाचा अधिकार त्यांना मिळायला हवा. अधिकार केवळ आरक्षणाचाच नाही तर तरुणांना रोजगाराचा अधिकार, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अधिकार आणि गोरगरिबांना शिक्षण, रोजगाराचा अधिकार हवा, असं हार्दिक म्हणाला. नोटाबंदी, जीएसटी रात्रीत लागू करता, मग आरक्षण का नाही? आरक्षणाची मागणी का होत आहे याचा विचार सरकारने करायला हवा. जाट, गुर्जर, पटेल आणि मराठा यांचा पिंड शेतीचा आहे. सध्या शेतीची अवस्था काय आहे हे पाहून आरक्षणाची मागणी वाढली आहे. मात्र कायद्याचं कारण देत आरक्षणाला नकार देत आहेत. पण नोटाबंदी, जीएसटी रात्रीत लागू करता, मग आरक्षण का लागू करत नाही? हा एक-दोन हजार लोकांचा नव्हे तर कोट्यवधी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, असं हार्दिक पटेल म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget