Republic Day 2024 LIVE Updates : प्रजासत्ताकदिनी राजपथावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं दर्शन

Republic Day 2024 : स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. यानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 26 Jan 2024 02:09 PM
Republic Day 2024 : संगमनेरमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा

Republic Day 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डी. के. मोरे जनता माध्यमिक विद्यालयात आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी आणि आनंदी वातावरण तयार व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने सुंदर शाळा अभियान चालू केले आहे. याचेच औचित्य साधत 1381 विद्यार्थ्यांच्या बैठकीची रचना शाळेची प्रतिकृती काढून तयार केली होती. 

Republic Day 2024 Update : भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

Republic Day 2024 Update : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात साकेत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि विविध पुरस्कार विजेते अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांचा सत्कार यावेळी दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला.


 

Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उपस्थित प्रेक्षकांचे आभार

Republic Day 2024 : उपराष्ट्रपतींना निरोप दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीत कर्तव्य पथाच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांनी उपस्थित प्रेक्षकांचे अभिवादन केले.  


 

Republic Day 2024 : 'एरो फॉर्मेशन'चं कर्तव्य पथावर प्रदर्शन

Republic Day 2024 : 'एरो फॉर्मेशन' मध्ये कर्तव्य पथावर दर्शन घडताना दिसतंय. या ठिकाणी अद्भूत असा सोहळा पाहायला मिळतोय. 



Republic Day 2024 LIVE : राजपथावर नारी शक्तीचं बाईक राईड करताना दर्शन 

Republic Day 2024 LIVE : राजपथावर नारी शक्तीचं बाईक राईड करताना दर्शन घडलं आहे. 




 

Republic Day 2024 LIVE UPDATE : दिल्लीतील कर्तव्य पथावर सांस्कृतिक कार्यक्रमाचं दर्शन

Republic Day 2024 LIVE UPDATE : दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्सवाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रदर्शन करण्यात आलं. 





Republic Day 2024 : राजधानी दिल्लीतील राजपथावर दिसली विविधतेत एकता

Republic Day 2024 : राजधानी दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतातील विविध संस्कृतीचं दर्शन घडतंय. या ठिकाणी विविधतेत एकता दिसून आली.  



Delhi : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर नारी शक्तीचे दर्शन

Delhi : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर नारी शक्तीचे दर्शन घडत आहे.





Republic Day 2024 : उत्तरप्रदेशचा चित्ररथ खास; अयोध्येच्या राम मंदिराने वेधलं लक्ष

Republic Day 2024 : उत्तरप्रदेशचा चित्ररथ खास; अयोध्येच्या राम मंदिराने वेधलं लक्ष


Republic Day 2024 : महाराष्ट्राचा चित्ररथ बाजी मारणार?

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनेकदा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथ बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

Republic Day Parade 2024: प्रजासत्ताकदिनी राजपथावर दिसले 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ

Republic Day Parade 2024 : राजधानी दिल्लीत राजपथावर (Rajpath) आज प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात (Parade)'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ दिसले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या (Tableau) देखाव्यावरील संपूर्ण शिल्प (Sculpture) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे.  त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लातही कोरले गेले.

Republic Day 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह

Republic Day 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह पाहायला मिळत आहे.


 





Republic Day 2024 Parade LIVE : कर्तव्यपथावर संचलनाला सुरुवात; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रमुख पाहुणे

Republic Day 2024 Parade LIVE : कर्तव्यपथावर संचलनाला सुरुवात झाली आहे. न्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

Republic Day 2024 : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

Republic Day 2024 : 75व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत.


 

Republic Day 2024 Parade : प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती मुर्मू करणार

Republic Day 2024 Parade : प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती मुर्मू करणार


PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.


Devendra Fadnavis Nagpur : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये झेंडावंदन

Devendra Fadnavis Nagpur : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये झेंडावंदन पार पडलं आहे. 


Ajit Pawar : 75 वर्षाच्या वाटचालीत देशाने शेतीपासून उद्योगापर्यंत सगळ्यात प्रगती केली : अजित पवार

Ajit Pawar : प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानातून मिळालेलं आहे. अनेकांनी तुरुंगवास भोगला, रक्त जाळलं, त्यांच्या त्यागाचे स्मरण करतो. 75 वर्षाच्या वाटचालीत देशाने शेतीपासून उद्योगापर्यंत सगळ्यात प्रगती केली. अनेक देशात लोकशाहीला धक्के लागत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे, असं अजित पवार म्हणाले.

Buldana : पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन पार

Buldana : 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज बुलढाणा येथे पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडल. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस अधीक्षक सुनील कडासने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते उपस्थित होत्या. बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केल.

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तर यांच्या हस्ते हिंगोलीत ध्वजारोहण
Abdul Sattar : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त  हिंगोली मध्ये  हिंगोली चे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे 
हिंगोली शहरातील संत नामदेव कवायत मैदानावर हे ध्वजारोहण करण्यात आले असून या ध्वजारोहणाला सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे उपस्थिती होती हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे आणि आमदार संतोष बांगर यांची सुध्धा या ध्वजारोहण कार्यक्रमाला हजेरी होती.

 

Ajit Pawar : पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Ajit Pawar : पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पुणे पोलिस ग्राऊंडवर हा कार्यक्रम संपन्न झाला.

Thane : ठाणे महापालिका भवन येथे ७५ प्रजासत्ताक दिन निमित्त ध्वजारोहण व ध्वजवंदन

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या भवन येथे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते. 75 वा प्रजासत्ताक दिन व प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापनदिन निमित्त ध्वजारोहण व राष्ट्रीय ध्वजवंदनाला मानवंदना देण्यात आले. त्यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी आणि ठाणेकर उपस्थित होते. तद्नंतर गुणवंत सफाई कामगारा व ज्याईमारती मध्ये कचऱ्याचे विघटन योग्य अशा इमारतीच्या पदाधिकाऱ्यांच्याआणि  ठाणेकर नागरिकांचा विशेष सत्कार आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते  करण्यात आले.

Supriya Sule on Republic Day 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Supriya Sule on Republic Day 2024 : खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीतील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचं ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र गीत देखील गायले गेले. खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळी दहा वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार सुप्रिया सुळे घेणार आहेत.





Supriya Sule on Republic Day 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Supriya Sule on Republic Day 2024 : खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीतील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचं ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र गीत देखील गायले गेले. खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळी दहा वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार सुप्रिया सुळे घेणार आहेत.





Supriya Sule on Republic Day 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Supriya Sule on Republic Day 2024 : खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीतील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचं ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र गीत देखील गायले गेले. खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळी दहा वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार सुप्रिया सुळे घेणार आहेत.





Rohit Pawar : भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो : रोहित पवार

Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!", असं ट्वीट त्यांनी केलं आहे.



Raj Thackeray : राज ठाकरेंकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Raj Thackeray : राज ठाकरेंनी ट्वीट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो", असं ट्वीट त्यांनी केलं आहे.





Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या हस्ते नवी मुंबईत झेंडावंदन

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या हस्ते नवी मुंबईत झेंडावंदन पार पडलं आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार आहेत. दरम्यान आझाद मैदानावर जाणारचं, असं जरांगे म्हणाले.

CM Eknath Shinde : 75 व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह; वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन

CM Eknath Shinde : 75 व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह पाहायला मिळत आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडलं.

Republic Day 2024 Songs : 'ऐ वतन' ते 'तेरी मिट्टी' पर्यंत, प्रजासत्ताकदिनी ऐका देशभक्तीवर आधारित 'ही' गाजलेली गाणी

Republic Day 2024 Songs : 26 जानेवारीला संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. देशाचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले होते. उद्या भारतातील प्रत्येकजण आनंदाने तिरंगा फडकावताना दिसणार आहे. शिवाय, देशभक्तीपर गीतेही सर्वत्र ऐकली जातील. त्यामुळे उद्या कोणते गाणी लोकांना ऐकण्यासाठी आवडतील? कोणत्या देशभक्तीपर गाण्यांना आजवर पसंती मिळाली आहे, हे जाणून घेऊयात...


Republic Day 2024 Songs : 'ऐ वतन' ते 'तेरी मिट्टी' पर्यंत, प्रजासत्ताकदिनी ऐका देशभक्तीवर आधारित 'ही' गाजलेली गाणी

Padma Awards 2024 : वैंकय्या नायडू आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण जाहीर, तर संगीतकार प्यारेलाल, मिथून चक्रवर्ती यांना पद्मभूषण, एकूण 132 जणांचा गौरव

Padma Awards 2024 : जासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2024 Winners) घोषणा झाली असून त्यामध्ये माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू (Venkaiah Naidu) आणि साऊथचा सुपरस्टार चिरंजिवी (Chiranjeevi) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर संगीतकार प्यारेलाल आणि अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. एकूण पाच जणांचा पद्मविभूषण तर 17 जणांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 


Padma Awards 2024 : वैंकय्या नायडू आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण जाहीर, तर संगीतकार प्यारेलाल, मिथून चक्रवर्ती यांना पद्मभूषण, एकूण 132 जणांचा गौरव

CM Eknath Shinde : "महाराष्ट्राला देशात क्रमांक एक राज्य बनवण्याची शपथ घेऊयात"; प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचा विशेष संदेश

CM Eknath Shinde : महाराष्ट्र देखील  प्रगतीत आपले बहुमूल्य योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. हे मी ठामपणे सांगू इच्छितो. महाराष्ट्रात विकासाचा एक नव पर्व आले. कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा यामध्ये आपण मोठी झेप घेत आहोत. आपल्या समृद्ध साधन सामग्री आणि पर्यावरणाला सुद्धा आपल्याला जपायचे आहे. महाराष्ट्राची ओळख एक शांतताप्रिय, सामाजिक सलोखा  असणार राज्य म्हणून आहे. आपल्यालाही ओळख वाढवायची आहे. आजच्या पवित्र दिवशी आपण भारतीय प्रजासत्ताकासाठी एकात्मतेची भावना वाढीस लावण्याची आणि महाराष्ट्राला देशात क्रमांक एक राज्य बनवण्याची शपथ घेऊयात. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद, जय महाराष्ट्र!

Rss Flag Hoisting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ. मोहन भागवत यांनी फडकावला राष्ट्रध्वज

RSS Flag Hoisting : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला. यावेळी संघ मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सीआयएसएफ आणि नागपूर पोलिसांचे तसेच उपस्थित असलेले संघ स्वयंसेवक जवान यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.





Republic Day 2024 : भारतीय हवाई दलाचा चित्ररथ खास; थीम आहे,"सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर"

Republic Day 2024 : स्क्वॉड्रन लीडर रश्मी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दल (IAF) मध्ये 144 एअरमन आणि चार अधिकारी असतील. स्क्वॉड्रन लीडर्स सुमिता यादव आणि प्रतिती अहलुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनंट कीर्ती रोहिल या कमांडरच्या मागे सुपरन्युमररी ऑफिसर म्हणून मार्चपास्ट करतील. 'भारतीय वायु सेना: सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर' या थीमवर हवाईदलाचा चित्ररथ आहे. चित्ररथात LCA तेजस आणि Su-30 IOR वरून उड्डाण करणारे आणि C-295 वाहतूक विमान कॉकपिटमध्ये महिला एअरक्रूद्वारे उड्डाण करत असल्याचे चित्रित केले आहे. टेबलावर ठेवलेला GSAT- 7A हे IAF च्या कार्यामध्ये अंतराळ तंत्रज्ञानाच्या समावेशाचे प्रतिनिधित्व करते.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थोड्याच वेळात ध्वजारोहण केले जाणार

CM Eknath Shinde : देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.

Republic Day 2024 Parade : तिन्ही दलातील महिला जवानांचे पथक परेडमध्ये सहभाग घेणार

Republic Day 2024 Parade : 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 100 हून अधिक महिला कलाकार भारतीय वाद्ये वाजवून परेडची सुरुवात करणार आहेत. या महिला कलाकारांद्वारे वाजवल्या जाणार्‍या शंख, नादस्वरम, नगाडा वाद्यवादनाने परेडची सुरुवात होईल. तिन्ही दलातील महिला जवानांचे पथक परेडमध्ये सहभाग घेणार आहे. यंदाचा फ्लाय पास्ट महिला वैमानिकांचा असणार आहे. 

Jaipur : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला

Jaipur : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला.





Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणार

Republic Day 2024 : प्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इम्युनल मॅक्रोन यावेळी पारंपरिक बग्गीतुन येणार आहेत. जवळपास 40 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनाची बग्गी वापरली जाणार आहे. यावर्षी राष्ट्रपतींच्या अंगरक्षक फलटणला 250 वर्षे पूर्ण होणार आहेत. परंपरेनुसार राष्ट्रध्वज फडकावला जाईल. 

Rss Flag Hoisting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ. मोहन भागवत राष्ट्रीय ध्वज फडकावणार

Rss Flag Hoisting : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात 8 वाजता सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्रीय ध्वज फडकावतील. यावेळी संघ मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सीआयएसएफ आणि नागपूर पोलिसांचे तसेच उपस्थित असलेले संघ स्वयंसेवक जवान राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देतील. त्यानंतर सरसंघचालकांचं उद्बोधनही होणार आहे. 

Pandharpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी रंगात रंगले विठ्ठल-रुक्मिणी; पाहा फोटो

Pandharpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विठुरायाचे रावुळी तिरंगी रंगात रंगली असून मंदिरात आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील एका भक्ताने ही फुल सजावटीची सेवा देवाला अर्पण केली आहे . झेंडू , गुलछडी, मोगरा अशी फुले आणि पानांचा वापर करून ही सजावट केली आहे . आज प्रजासत्ताकदिना निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या गळ्यात तिरंगी रंगाची पट्टी देखील सोडली आहे.


 

Republic Day 2024 LIVE : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

Happy Republic Day 2024 : आज स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच कर्तव्यपथावर सशक्त भारत आणि महिला शक्तीचं दर्शन घडणार आहे.. तिन्ही सैन्य दलाच्या महिला तुकडीचं पहिल्यांदाच संचलन आणि विविध राज्यांचे चित्ररथ आकर्षण ठरणार आहे.

Happy Republic Day 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार

Happy Republic Day 2024 : भारताचा आज 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे असतील.


BSE : मुंबई शेअर बाजार तिरंग्याच्या रंगात रंगणार, सर्वात जुन्या शेअर बाजारात असा साजरा होणार प्रजासत्ताक दिन

Nagpur News नागपूर : यावर्षी स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) आपण साजरा करणार आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. दरवर्षी फुटाळा तलाव (Futala) चौपाटी मार्गावर सकाळपासूनच तरुणाईची मोठी गर्दी उसळते. सोबतच त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येते.  त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 26 जानेवारीला फुटाळ्यात सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Republic Day 2024 : मुंबई शेअर बाजार तिरंग्याच्या रंगात रंगणार, सर्वात जुन्या शेअर बाजारात 'असा' साजरा होणार प्रजासत्ताक दिन

Republic Day 2024 : देशाच्या 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत असून त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी शेअर बाजारातही (Share Market) त्याचा उत्साह असल्याचं दिसून येतंय. देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी गुरूवारी संध्याकाळी मुबई शेअर बाजाराची इमारत (BSE) देशाच्या तिरंग्या राष्ट्रध्वजाच्या तीन रंगात सजलेली पाहायला मिळणार आहे. 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण देशभरात उत्साह दिसून येतोय. त्या निमित्ताने मुंबईतील रस्ते, वाहने, अनेक संस्था यांवर तिरंगा आणि तिरंग्यांची सजावट सहज पाहायला मिळत आहे. 

Republic Day 2024 : यंदाचा प्रजासत्ताक दिन 75 वा की 76 वा?

Republic Day 2024 : 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तब्बल 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर 1950 मध्ये भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून 'प्रजासत्ताक दिन' (Republic Day) साजरा केला जातो. यावर्षी स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. 

Republic Day 2024 : 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का?

Republic Day 2024 : 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देशाचे राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी होतात आणि या दिवशी ध्वजारोहण करतात. यानंतर, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हापासून हा सण देशात साजरा केला जातो. हा तो दिवस आहे जेव्हा भारताने आपल्या देशाच्या आणि नागरिकांच्या हितासाठी संविधान (नियम) मुक्तपणे पारित केले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. यानंतर, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

Republic Day Parade : दिल्लीत झळकणार शिवराज्याभिषेकाचा सोहळा; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ

Republic Day Parade Maharashtra Tableau 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Parade) दिल्लीत होणाऱ्या चित्ररथ संचलनात (Tableau Parade) सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथात (Maharashtra Tableau) शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात येणार आहे. "भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान - छत्रपती शिवाजी महाराज" या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे.सांस्कृतिक मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी कर्तव्यपथावरील संचलनात हा चित्ररथ सामिल करून घेण्याकरता विशेष प्रयत्न केले आहेत.

Republic Day Parade 2024: प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवशाही, चित्ररथात झळकणार यवतमाळच्या पाटणबोरीत तयार झालेली शिल्पे

Yavatmal News : राजधानी दिल्लीत राजपथावर (Rajpath) उद्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात (Parade)'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ दिसणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या (Tableau) देखाव्यावरील संपूर्ण शिल्प (Sculpture) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे.  त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लातही कोरले जाणार आहे. 

पार्श्वभूमी

Republic Day 2024 : स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आपण साजरा करणार आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.