एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लव्ह जिहाद प्रकरण : हादिया आज सुप्रीम कोर्टात हजर होणार!
मागील महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी हादिया गैरहजर राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 27 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती.
नवी दिल्ली : धर्मांतर करुन हादिया बनलेली केरळची अखिला अशोकन आज सर्वोच्च न्यायालयात हजर होणार आहे. यावेळी हादिया सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.
मागील महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी हादिया गैरहजर राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 27 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती.
काय आहे प्रकरण?
धर्मांतरानंतर हादियाने मुस्लीम तरुणाशी केलेला विवाह केरळ उच्च न्यायालयाने रद्द केला होता. शिवाय तिला वडिलांकडे सोपवावं, असा आदेशही हायकोर्टाने दिला होता. काही जण हे 'लव्ह जिहाद'चं प्रकरण असल्याचं सांगत विरोध करत आहेत.
धर्मांतर करण्याआधी हादिया हिंदू तरुणी होती आणि तिचं नाव अखिला अशोकन होतं. धर्मांतरानंतर तिने शैफीन जहां नावाच्या तरुणाशी विवाह केला होता.
तरुणीचे वडील के. एम. अशोकन यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन लग्न रद्द करण्याची विनंती केली होती. तरुणीचं जबरदस्तीने धर्मांतर केलं आणि शैफीनचा (हादियाचा पती) संबंध आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. तसंच पीएफआयचे सदस्य हिंदू तरुणींचं ब्रेन वॉश करुन इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडतात, असा आरोपही याचिकेत केला आहे.
यानंतर केरळ उच्च न्यायालयाने हादिया आणि शैफिनचा विवाह रद्द केला आणि मुलीला वडिलांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला.
शैफीनची सर्वोच्च न्यायालयात धाव
हायकोर्टाने लग्न रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर शैफीनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर सुप्रीम कोर्टने एनआयएला हादियासोबतच तिच्याशी मिळत्याजुळत्या लव्ह जिहादसारख्या प्रकरणांचा तपास करण्याचा आदेश दिला होता. मुलींचं ब्रेन वॉश करुन त्यांचं धर्मांतर केलंय का, ह्याचा तपास करण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने एनआयएला दिला आहे.
तरुणीची इच्छा महत्त्वाची
तरुणी सज्ञान आहे आणि तिची इच्छा महत्त्वाची आहे. सज्ञान असल्याने ती कोणासोबतही लग्न करण्यासाठी स्वतंत्र आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत केली होती.
याला उत्तर देताना एनआयएने म्हटलं होतं की, "आम्हाला केरळमध्ये अशाप्रकारच्या 89 प्रकरणात एकाच प्रकारचा पॅटर्न दिसला."
मी मुस्लीम महिला आहे
दुसरीकडे हादियाने स्वत:ला मुस्लीम महिला असल्याचं म्हटलं आहे. मी एक मुस्लीम महिला आहे आणि माझ्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मला पती शफीनसोबत राहायचं आहे, असं हादिया सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी म्हणाली.
इस्लाम धर्म स्वीकारताना माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. त्यामुळे न्यायालयाने मला न्याय द्यावा, अशी विनंतीही तिने केली आहे.
लव्ह जिहादचं प्रकरण
तर काही हिंदूत्त्ववादी संघटना हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा करत आहे. मुस्लीम तरुण हिंदू तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात.
मागील वर्षी जानेवारीमध्ये 23 वर्षीय अखिलाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी अखिला शिक्षणासाठी तामिळनाडूमध्ये आपल्या दोन मुस्लीम तरुणींसोबत राहत होती. त्यानंतर 21 नोव्हेंबरला हादियाच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन गोपनीय सुनावणी करण्याची मागणी केली होती. 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने हादिया उर्फ अखिलाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement