एक्स्प्लोर
धमकीनंतर गुरमेहरचा दिल्ली सोडण्याचा निर्णय
नवी दिल्ली : कारगिल युद्धातील शहीद जवानाची मुलगी गुरमेहर कौर दिल्ली सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जाणार आहे. बलात्कार आणि जीवे मारण्याच्या कथित धमकीचा सामना केल्यानंतर गुरमेहरने हा निर्णय घेतला आहे. तिच्या मित्राने ट्वीटरवरुन ही माहिती दिली.
दिल्ली पोलिसांनीही या प्रकरणाकडे लक्ष घालत एफआयआर दाखल करत चौकशी सुरु केली आहे. शिवाय गुरमेहरला सुरक्षा पुरवली जाईल आणि धमकी देणाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
भीतीपोटी गुरमेहरला दिल्ली सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतासारख्या देशात अशा घटना घडणं निंदणीय आहे. सोशल मीडियावरुन धमक्या देणाऱ्यांना या गोष्टीचा आता अभिमान वाटत असेल, असं गुरमेहरच्या मित्राने म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावरून कथितपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांकडून बलात्काराच्या धमक्या येत असल्याची तक्रार गुरमेहर कौर हीने दिल्ली महिला आयोगाकडे केली होती. गुरमैहर कारगिल युद्धातील शहीज जवान मनदीप सिंह यांची मुलगी आहे.
दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील हिंसाचारानंतर गुरमेहरने त्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र यानंतर आपल्याला अभाविपकडून बलात्काराची धमकी मिळाली, पण मी अभाविपला घाबरत नाही, असा फलक हाती घेतलेला फोटो गुरमेहरने फेसबुकवर टाकला होता.
गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यामुळे आपल्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारलं, असं वक्तव्य गुरमेहरने केलं होतं. या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला.
वादात राहुल गांधींची उडी
गुरमेहर कौरला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही गुरमेहरला पाठिंबा दिला आहे. भीती आणि छळाच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता, राग आणि अज्ञानतोविरोधात प्रत्येक ठिकाणी एक गुरमेहर उभी राहील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.
संबंधित बातमी : शहीद जवानाच्या मुलीला बलात्काराची धमकी, डाव्या विद्यार्थी संघटना आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement