एक्स्प्लोर

Gujrat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान; 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात

Gujrat Assembly Election : गुजरातमध्ये (Gujrat Election) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे.

Gujrat Assembly Election : गुजरातमध्ये (Gujrat Election) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. आज पहिल्या टप्प्यात एकूण 2,39,76,760 मतदार मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ 6 उमेदवार उभे केले आहेत.

दोन टप्प्यात मतदान - 
गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.  

2017ची निवडणूक झाली होती चुरशीची

मागच्या वेळच्या म्हणजेच 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळाली होती. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं पण तरीही तो सामना चुरशीचा झाला होता. भाजपनं 99 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं 80 जागांवर विजय मिळवला होता. 2017 ला बहुमत भाजपला मिळालं असलं तरी काँग्रेसनं भाजपला कडवी झुंज दिली होती, असं म्हणता येईल. गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे. यंदा भाजपसमोर काँग्रेससह आपनं देखील आव्हान उभं केलं आहे. 

पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा रोड शो
पहिल्या टप्प्याचं मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा  अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हा रोड शो असेल.  तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी 10.30 वाजता रोड शो करतील.   

आणखी वाचा :

01 December Headline : गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान; पंतप्रधानांचा रोड शो, औरंगाबादेत रिक्षाचालकांचा संप; आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget