एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक
मेहसाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सीएम टू पीएम आसूड यात्रा काढणाऱ्या आ. बच्चू कडू यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. वडनगरमध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आमदार बच्चू कडूंची गेल्या 15 दिवसांपासून सीएम टू पीएम आसूड यात्रा सुरु आहे. काल त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर आडवलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अडवणुकीचा निषेध केला.
पण आज आ. बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये प्रवेश करुन वडनगरजवळ निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, यावरुन गुजरातमध्ये राजकारण सुरु झालं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी गुजरात पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. अहमद पटेल यांनी ट्विट करुन सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत नसल्याचं म्हणलं आहे.
It is learnt that Shetkari Saghtana, a farmers organization from Maharastra wanted to understand problems of Gujarat farmers 1/2
— Ahmed Patel (@ahmedpatel) April 20, 2017
For reasons best known to the state government,it denied them entry into Gujarat. Very surprising 2/2 — Ahmed Patel (@ahmedpatel) April 20, 2017संबंधित बातम्या बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा गुजरात सीमेवर रोखली! सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना बच्चू कडूंची जीभ घसरली हेमामालिनी रोज बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का? : बच्चू कडू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement