एक्स्प्लोर

गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी!

Gujarat Himachal Pradesh Exit Poll LIVE गुजरातमधील 182 जागा हिमाचलमधील 68 जागांचा कौल कुणाला?

गांधीनगर: गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेत येण्याचा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर हिमाचल प्रदेशातही सत्ताधारी काँग्रेसला खाली खेचण्यात भाजपला यश येणार असल्याचं दिसतंय. एबीपी न्यूज-सीएसडीएसने आज सर्वात मोठा एक्झिट पोल जाहीर केला. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. गुजरातमध्ये मोदीच गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान पार पडलं. यानंतर एबीपी न्यूज-सीएसडीएसचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला. यानुसार सौराष्ट्र-कच्छ, दक्षिण गुजरात, मध्य गुजरात आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपच स्पष्ट मुसंडी मारेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. 182 जागांपैकी भाजपला तब्बल 117 जागा मिळण्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर काँग्रसेला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अल्पेश-जिग्नेश-हार्दिकचा करिष्मा नाही ओबीसी नेते अल्पेश ठाकोर, दलित नेते जिग्नेश मेवानी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचा फारसा फायदा काँग्रेस झालेला नाही, असं एबीपी न्यूज-सीएसडीएसचा एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. कारण काँग्रेसच्या केवळ तीन जागाच वाढताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2012 मध्ये काँग्रेसकडे 61 जागा होत्या, यंदा त्या वाढून 64 होतील असा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत 2012 मध्ये भाजपला 115 जागा होत्या, यंदा त्या वाढून 117 होतील असा अंदाज आहे. गुजरातमध्ये मतदान गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान झालं. यापूर्वी  पहिल्या टप्प्यतील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं. गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे सुपरफास्ट निकाल तुम्ही 18 तारखेला एबीपी माझावर पाहू शकाल. हिमाचल प्रदेशमध्येही मोदी हिमाचल प्रदेशमध्येही यंदा भाजपचंच सरकार येईल, असा अंदाज आहे. हिमाचलमधील 68 जागांपैकी 45 जागा भाजप जिंकेल, तर काँग्रेस 21 आणि इतरांना 2 जागा मिळतील असा अंदाज एबीपी न्यूज-सीएसडीएसने वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशात 9 डिसेंबरला 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्याचं आव्हान आहे. तर भाजप नेते प्रेम कुमार धुमल यांनी वीरभद्र सिंह यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. हिमाचलचा 2012 चा निकाल सध्या हिमाचल प्रदेशातील 68 जागांमध्ये काँग्रेसकडे 35, तर भाजपकडे 28 जागा आहेत. तर चार अपक्ष आहेत. एक जागा रिकामी आहे. हिमाचल प्रदेशचा एक्झिट पोल - 68
  • भाजप - 45
  • काँग्रेस - 21
  • अन्य - 2

LIVE UPDATE

#ABPExitPoll – गुजरातचा एक्झिट पोल एकूण जागा 182
  • भाजप - 117
  • काँग्रेस64
  • अन्य 1
सौराष्ट्र- कच्छ (एकूण जागा 54) -  भाजप 34, काँग्रेस 19 आणि  जागांचा अंदाज
  • भाजप - 31 ते 37 (49%)
  • काँग्रेस 16 ते 22 (41%)
  • अन्य - 0 ते 2 (10%)
  • गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी!
सौराष्ट्र -कच्छमध्ये भाजपला मतांच्या टक्केवारीनुसार 31 ते 37 यादरम्यान जागा मिळू शकतील. तर काँग्रेसला 16 ते 22 आणि अन्य/अपक्षांना 0 ते 2 जागा मिळतील. दक्षिण गुजरात (एकूण जागा 35) - भाजप 24, काँग्रेस 11 आणि  जागांचा अंदाज
  • भाजप - 21  ते 27 (52%)
  • काँग्रेस 9 ते 13 (40%)
  • अन्य - 0 ते 1 (8%)
दक्षिण गुजरातमध्ये 7 जिल्हे आहेत. यामध्ये 35 जागा आहेत. ABP Gujrat exit Poll (1) पहिल्या टप्प्यातील 89 जागांपैकी
  • भाजप- 58
  • काँग्रेस - 30
  • अन्य/इतर - 1
उत्तर गुजरात एकूण जागा (53) - भाजप 35, काँग्रेस 18 आणि  00  जागांचा अंदाज
  • भाजप - 32  ते 38 (49%)
  • काँग्रेस 16 ते 22 (42%)
  • अन्य - 0  (9%)
गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी! मध्य गुजरात (एकूण जागा - 40) - भाजप 24, काँग्रेस 16 आणि  00  जागांचा अंदाज
  • भाजप - 21 ते 27  (47 %)
  • काँग्रेस   13 ते 19 (42%)
  • अन्य - 0  ( 13%)
गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी! हिमाचल प्रदेशचा एक्झिट पोल - 68
  • भाजप - 45
  • काँग्रेस - 21
  • अन्य - 2
(हे पेज अपडेट होत राहील, नव्या माहितीसाठी पेज रिफ्रेश करत राहा) गुजरात एकूण जागा  - 182  सौराष्ट्र-कच्छ (एकूण जागा- 54) उत्तर गुजरात (एकूण जागा - 53) दक्षिण गुजरात (एकूण जागा - 35) मध्य गुजरात (एकूण जागा - 40) हिमाचल प्रदेश - 68

1.    पूर्व हिमाचल  - 34 

2.    पश्चिम हिमाचल – 34 

एक्झिट पोल कुठे पाहू शकाल? गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे एक्झिट पोल तुम्ही एबीपीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. टीव्हीसह मोबाईलवर तुम्हाला एक्झिट पोल पाहता येईल. तुम्ही ABP LIVE हे अप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला प्रत्येक बातमीचे नोटिफिकेशन तर मिळेलच, शिवाय तुम्हाला लाईव्ह टीव्हीही पाहता येईल. #ABPExitPoll या हॅशटॅगसह तुम्ही ट्विटरवर ट्विट करु शकता. *लाईव्ह टीव्ही - http://abpmajha.abplive.in/live-tv *फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv * यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhalive पहिला टप्पा दरम्यान, गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यतील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं. गुजरात निवडणूक : एकूण जागा 182 पहिला टप्पा: 89 जागा: मतदानाची टक्केवारी 68 % : सौराष्ट्र- कच्छ, राजकोट, जामनगर दुसरा टप्पा : 93 जागा: मतदानाची टक्केवारी  --  : दक्षिण, मध्य आणि उत्तर पाटन, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, खेडा, महिसागर, पंचमहल, दाहोद, आणंद, बडोदा आणि उदेपूर कोणत्या विभागात कुणाची बाजी? गुजरातमध्ये कोणत्या विभागात कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. सौराष्ट्र-कच्छ (एकूण जागा- 54) उत्तर गुजरात (एकूण जागा - 53) दक्षिण गुजरात (एकूण जागा - 35) मध्य गुजरात (एकूण जागा - 40) गुजरातचा 2012 मधील निकाल भाजप – 115 काँग्रेस – 61 हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशात 9 डिसेंबरला 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्याचं आव्हान आहे. तर भाजप नेते प्रेम कुमार धुमल यांनी वीरभद्र सिंह यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. हिमाचलचा 2012 चा निकाल सध्या हिमाचल प्रदेशातील 68 जागांमध्ये काँग्रेसकडे 35, तर भाजपकडे 28 जागा आहेत. तर चार अपक्ष आहेत. एक जागा रिकामी आहे. संबंधित बातम्या गुजरातमध्ये कुणाची सत्ता? एबीपी न्यूजचा पहिला ओपिनियन पोल गुजरात विधानसभा निवडणूक 2017 ओपिनियन पोल  ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Beed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरेABP Majha Headlines : 12 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Embed widget