एक्स्प्लोर
गुजरातमध्ये मोदी येणार का? कुत्र्याचा हात उंचावून होकार
'या गोड कुत्र्याला सगळंच माहित आहे' अशी कॅप्शन देत मालवीय यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावरुन भाजप समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेस येणार का? मोदी येणार का? असे प्रश्न विचारल्यावर मोदींच्या नावानंतर मान डोलवणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
'या गोड कुत्र्याला सगळंच माहित आहे' अशी कॅप्शन देत मालवीय यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावरुन भाजप समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे.
काय आहे व्हिडिओ?
या व्हिडिओमध्ये एका तरुणीने कुत्र्याला उचलून घेतलं आहे. गुजराती भाषेत ती त्याला 'काँग्रेस आवानू? राहुल आवानू?' म्हणजेच काँग्रेस येणार का? राहुल येणार का? असा प्रश्न आधी विचारते. यावर कुत्रा काहीच प्रतिक्रिया देत नाही. त्यानंतर 'मोदी आवानू?' म्हणजेच मोदी येणार का? असा प्रश्न ती करते. त्यावर कुत्रा हात उंचावून मान डोलावतो.
https://twitter.com/malviyamit/status/941525771625123840
हा सगळा प्रकार पुन्हा एकदा केला जातो. त्यावर भाजप आणि काँग्रेसविषयीच्या प्रश्नाला कुत्र्याची तीच प्रतिक्रिया येते.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement
























