एक्स्प्लोर

पेट्रोल-डिझेल आता GST च्या कक्षेत येण्याची शक्यता; GST कौन्सिलची आज महत्वाची बैठक

लखनऊमध्ये आज GST कौन्सिलची महत्वाची बैठक होणार आहे. पेट्रोल-डिझेलला (Petrol-Diesel) जीएसटीच्या कक्षेत आणण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई : पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून त्याच्यावर लावण्यात आलेला भरमसाठ कर कमी करायचा की तो कर आहे तसाच ठेवायचा याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज लखनऊमध्ये जीएसटी कौन्सिलची  बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तब्बल 20 महिन्यांनी ही जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. 

देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि समान कर लावावा अशी मागणी अनेक खासदारांकडून करण्यात येत होती. मार्च मध्ये झालेल्या बजेट सेशनमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याचे सुतोवाच दिले होते. केंद्र सरकार यासाठी तयार असून राज्यांनी त्याचा विचार केला पाहिजे असं त्या म्हणाल्या होत्या. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर त्या किंमती थेट 65 ते 75 रुपयांवर येणार आहेत. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

राज्यांच्या विरोधाची शक्यता
पेट्रोल-डिझेलवर केंद्राप्रमाणे राज्यांकडूनही कर लावण्यात येतो. राज्याच्या महसुलासाठी हा कर अत्यंत महत्वाचा आहे. पण जर केंद्राने पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर राज्यांचा मोठा महसूल बुडणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरुवारी बोलताना सांगितलं की, केंद्राने आपल्या अधिकारातील कर कमी करावेत, राज्यांच्या अधिकारावर गदा आणू नये. 

ऑनलाईन फूड महागणार? 
जीएसटीच्या फिटमेंट पॅनेलने ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर किमान 5 टक्क्यांचा जीएसटी लावावा अशी शिफारस केली आहे. भारतात सध्या हजारो लोक हे नियमितपणे ऑनलाईन फूड ऑर्डर करत आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पण आता ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर जीएसटी लावला तर या गोष्टी ग्राहकांना अधिक रक्कम मोजून खरेदी कराव्या लागतील. जीएसटीच्या फिटमेंट पॅनेलने झोमॅटो, स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी कंपन्यांना ई-कॉमर्स ऑपरेटर मानलं जावं आणि त्यावर 5टक्क्यांचा जीएसटी लावण्यात यावा अशी शिफारस केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget