GST Collection: सलग आठव्या महिन्यात 1 लाख कोटीहून अधिक जीएसटी कलेक्शन; गेल्यावर्षीच्या तुलनेन 65 टक्के अधिक
मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा मे 2021 मधील महसूल 65 टक्के अधिक आहे.
नवी दिल्ली : सरकारने मे महिन्यात एकूण 1,02,709 कोटी रुपये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित केला आहे. सलग आठव्या महिन्यात एक लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन झालं आहे. त्यापैकी सीजीएसटी 17,592 कोटी रुपये , एसजीएसटी 22,653 कोटी रुपये, आयजीएसटी 53,199 कोटी रुपये आणि अधिभार 9,265 कोटी रुपये आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मे 21 मध्ये विवरणपत्र दाखल करण्यासाठी 15 दिवस विलंबित विवरणपत्र दाखल करण्यावर व्याजात सवलत या स्वरूपात करदात्यांसाठी विविध दिलासादायक उपाय योजल्याने आकडेवारीत 4 जूनपर्यंत देशांतर्गत व्यवहारातून झालेल्या जीएसटी संकलनाचा समावेश आहे.
या महिन्यात सरकारने नियमित तडजोड म्हणून आयजीएसटीमधून 15,014 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 11,653 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा मे 2021 मधील महसूल 65 टक्के अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल 56 टक्के अधिक राहिला आणि देशांतर्गत व्यवहारापासून मिळणारा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या या स्रोतातील महसुलापेक्षा 69 टक्के अधिक राहिला.
सलग आठव्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांहून जास्त जीएसटी महसूल संकलित झाला आहे. महामारीमुळे अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन असतानाही हे शक्य झाले आहे. याव्यतिरिक्त, 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांनी 4 जूनपर्यंत आपले विवरण सादर करणे आवश्यक होते, अन्यथा 20 मेपर्यंत ही मुदत होती. 5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या लहान करदात्यांना विनाविलंब आणि व्याजाशिवाय विवरणपत्र दाखल करण्यासाठी अद्याप जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत आहे. तोपर्यंत या करदात्यांकडून मिळणारा महसूल स्थगित करण्यात आला आहे. अशा प्रकारे मे 2021,या महिन्यातील वास्तविक महसूल अधिक असेल आणि जेव्हा सर्व वाढीव तारखांची मुदत संपेल तेव्हा तो समजू शकेल.
महत्वाच्या बातम्या :