एक्स्प्लोर
ट्रेन उशिरा धावत असल्यानं नवरदेवाचं सुरेश प्रभूंना साकडं
पटना : ट्रेन लेट झाली की, त्याचा फटका कसा बसतो, याची अनेक उदाहरणं आपण ऐकली असतील. पण याच कारणामुळे जर तुम्हाला एका नवरदेवाचं लग्न मोडण्याच्या स्थितीत येऊन ठेपलं होतं, असं कुणी सांगितलं, तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात असाच प्रकार घडला आहे.
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील नवाडीह गावाचा रहिवासी सुशील कुमारचं दिल्लीत लग्न होणार होतं. यासाठी सोमवारी संध्याकाळी 6 वाजताचा निश्चित करण्यात आला होता.
सुशीलनं 86 वऱ्हाडींचं 14 मे रोजीचं मगध एक्सप्रेसचं रिझर्व्हेशन केलं होतं. ही ट्रेन सुशीलच्या गावापासून जवळच असलेल्या आरा रेल्वे स्थानकात रविवारी संध्याकाळी 7.04 मिनिटांनी येणार होती. तर सोमवारी सकाळी 11.50 मिनिटांनी ती नवी दिल्लीत पोहचणार होती.
पण ही ट्रेन तब्बल 3.30 तास उशीराने आरा स्थानकात दाखल झाली. ही ट्रेन उशीरा धावत असल्याची सूचना वऱ्हाडी मंडळींना आधीच देण्यात आली होती. पण ट्रेन दिल्लीत पोहचणार की नाही, या चिंतनं नवरदेवाची घालमेल सुरु होती. कारण मुहूर्त टळून गेल्यास, त्याला लग्नासाठी पुन्हा वाट पाहावी लागणार होती. त्यामुळे सुशील कुमारने रेल्वे मंत्र्यांना ट्वीट करुन आपली कैफियत मांडली.
यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्विटची दखल घेऊन सुशीलची तक्रार लखनऊ स्टेशन मास्तरांकडे वर्ग केली. त्यानंतर लखनऊ स्टेशन मास्तरांनी ती अलाहबाद स्टेशन मास्तरांकडे वर्ग केली. पण तो पर्यंत ट्रेनला अलाहबादला पोहचण्यास पाच तास उशीर झाला होता. या दरम्यान, नवरदेवाची घालमेल सुरुच होती. नवरदेव सातत्यानं रेल्वे मंत्र्यांना ट्वीट करुन ट्रेनची गती वाढवण्याची मागणी करत होता. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांच्या आदेशावरुन रेल्वेच्या मोटरमननं गती वाढवून दोन तासाचा वेळ रिकव्हर केला, आणि ही ट्रेन दिल्लीत 4.45 मिनिटांनी दाखल झाली. यानंतर सुशील कुमारनं सुटकेचा निश्वास सोडला. आणि ठरलेल्या मुहुर्तापूर्वी तो लग्न मंडपात दाखल झाला. यानंतर त्याचं धडाक्यात लग्न झालं. रेल्वे मंत्रालयानं वेळीच दखल घेतल्यानं नवरदेवानं रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले.@DrmDnr सर मेरे विवाह समारोह के सफल होने में आपका अतुल्य योगदान है कर आज मगध एक्सप्रेस को समय से चलाने की कृपा करें। pic.twitter.com/6qjjpov4f3
— sushil kumar (@sushilk80614307) May 14, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement