एक्स्प्लोर
इंधन दरवाढीवर लवकरच दीर्घकालीन उपाययोजना : अमित शाह
सरकार लवकरच याबाबत लाँग टर्म धोरण घेऊन येईल, विचार सुरू आहे, असं उत्तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधन दरवाढीवर दिलं.
नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलचे दर आत्ता जे आहेत, ते काँग्रेसच्या काळात तीन वर्षे अशाच पातळीवर राहिले होते. मग आमच्या काळात तीन दिवस हे दर राहिले की लगेच ओरड का सुरु होते? सरकार लवकरच याबाबत लाँग टर्म धोरण घेऊन येईल, विचार सुरू आहे, असं उत्तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधन दरवाढीवर दिलं.
केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शाहांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली, तर काँग्रेसवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सरकारने केलेल्या कामांचं कौतुकही केलं.
''शिवसेना अजूनही सत्तेत''
आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना-भाजपाने एकत्र लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे. जर तुम्ही शिवसेनेला याबाबत प्रश्न विचारल्यास त्यांना एकत्र लढायचे नाही असे ते सांगतात. मात्र, असं असलं तरीही ते महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत आहेत, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
''एनडीएचं कुटुंब वाढलं''
नितीशकुमार यांचा जनता दल युनायडेट हा पक्ष एनडीएत सहभागी झाला. त्याचबरोबर 2014 नंतर इतर 11 आणखी पक्ष एनडीएचा भाग झाले आहेत. त्यामुळे एनडीएचे कुटुंब वाढलं आहे, घटलेलं नाही. यापैकी केवळ तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एनडीएतून बाहेर पडले आहेत, असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement