एक्स्प्लोर
Advertisement
दोन लाखांपेक्षा अधिकच्या रोख व्यवहारांवर शंभर टक्के दंड
नवी दिल्ली : तुम्ही दोन लाखांपेक्षा जास्तीचा व्यवहार रोख रकमेनं केला, तर तुम्हाला शंभर टक्के दंड लागू शकतो. काळ्या पैशांवर चाप लावण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे.
सर्वसाधारण अर्थसंकल्पात केंद्र सरकारने तीन लाख अथवा त्याहून अधिक रुपयांच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आता सरकारने रोकड व्यवहारांची मर्यादा तीन लाखांहून दोन लाखांवर आणण्याची तयारी सुरु केली आहे.
विशेष चौकशी पथकाच्या शिफारशीनुसार तीन लाखांपेक्षा अधिकच्या रोकड व्यवहारांवर बंदी घातली होती. अर्थसंकल्पावेळी केंद्र सरकारनं यासंबंधी करण्यात येणाऱ्या सुधारणेसंबंधी घोषणा केली होती. या नियमाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार होती. मात्र आता रोकड व्यवहारांची मर्यादा दोन लाख रुपये करण्यात आली आहे.
त्यामुळे दोन लाख अथवा त्यापेक्षा अधिक रोखीच्या व्यवहारांवर 100 टक्के दंड भरावा लागणार आहे. रोख रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला हा दंड भरावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही अडीच लाखाचा रोख व्यवहार केला तर तुम्हाला तब्बल अडीच लाख रुपये दंड भरावा लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement