एक्स्प्लोर
Advertisement
तात्काळ तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक आज लोकसभेत!
तात्काळ तलाकवर बंदी घालण्यात आली असून सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यात दिला होता. स्काईप किंवा व्हॉट्सअॅपवर पतीने दिलेला तात्काळ तलाक घटनाबाह्य असल्याचं कोर्टाने सांगितलं होतं.
नवी दिल्ली : तात्काळ तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकार लोकसभेत सादर करणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करुन विधेयक सादर करताना संसदेत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
कायदा मंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडतील. मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं संरक्षण आणि कोणत्याही व्यक्तीने पत्नीला तोंडी, इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर पद्धतीने तलाक देण्यावर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात आहे.
तात्काळ तलाकवर बंदी घालण्यात आली असून सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यात दिला होता. स्काईप किंवा व्हॉट्सअॅपवर पतीने दिलेला तात्काळ तलाक घटनाबाह्य असल्याचं कोर्टाने सांगितलं होतं.
विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने मागील आठवड्यातच या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. मुस्लीम महिला (विवाह हक्काचं संरक्षण) विधेयक हे प्रस्तावित बिल सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांनी हे विधेयक तयार केलं आहे.
तात्काळ तलाक शिक्षेच्या श्रेणीत
तात्काळ तलाक संविधान, नैतिकता आणि स्त्री-पुरुष समानतेच्या विरोधात असून विधेयकात तात्काळ तलाकला शिक्षेच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. तात्काळ तलाक देणाऱ्यांविरोधात शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. ही शिक्षा वाढवून तीन वर्षांपर्यंत केली जाऊ शकते.
राज्यांकडून उत्तर मागवलं
या विधेयकाचा मसुदा 1 डिसेंबरला सर्व राज्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यांच्याकडून 10 डिसेंबरपर्यंत उत्तर मागवलं होतं.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
मागील रविवारी या संदर्भात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. ज्यात तात्काळ तलाकच्या प्रस्तावित विधेयकावर चर्चा झाली. पण अनेक तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक महिला विरोधी असल्याचं सांगत बोर्डाने ते फेटाळलं.
तिहेरी तलाक आणि तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे काय?
तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे एकाच वेळी तीन वेळा तलाक (तलाक तलाक तलाक) अशी उच्चारणा. मात्र तिहेरी तलाकमध्ये प्रतीक्षेचा कालावधी येतो. पहिल्यांदा केलेली तलाकची उच्चारणा आणि घटस्फोटाचा अंतिम निर्णय यामध्ये सर्वसामान्यपणे तीन मुस्लीम महिन्यांचा काळ असतो.
तात्काळ तिहेरी तलाक कसा जारी केला जातो?
पती पत्नीला उद्देशून 'तलाक तलाक तलाक' असं म्हणतो. बऱ्याचदा रागाच्या भरात किंवा मद्याच्या अंमलाखाली, फोनवर, लेखी तलाकनामा, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर हे बोललं जातं.
तात्काळ तिहेरी तलाक विधेयकाचं वैशिष्ट्य
तात्काळ तलाक बेकायदेशीर आणि अवैध होईल
तात्काळ तलाक दिल्यास पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो
तात्काळ तलाक अजामीनपात्र गुन्हा असेल
पीडित महिलेला पोटगीचा अधिकार
मुलांच्या जबाबदाची निर्णय न्यायदंडाधिकारी घेणार
जम्मू-काश्मीर वगळता सर्व देशात कायदा लागू होणार
संबंधित बातम्या
'तात्काळ तलाक प्रथेविरोधातील कायदा अधिक कडक करा'
तात्काळ तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक कॅबिनेटकडून मंजूर
तिहेरी तलाक आणि तात्काळ तिहेरी तलाकमध्ये फरक काय?
तिहेरी तलाकच्या कायद्यासाठी हालचाली, राजनाथ सिंह यांची मंत्र्यांसोबत बैठक
तिहेरी तलाकमध्ये सरकारनं हस्तक्षेप करु नये : मुस्लिम लॉ बोर्ड
तोंडी तलाक देणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास, तिहेरी तलाक कायद्याचा मसुदा तयार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिहेरी तलाकवर विधेयक?
‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement