एक्स्प्लोर

मोदी सरकारच्या काळात खासदारांवर तब्बल 1,997 कोटींचा खर्च

लोकसभेत एकूण 545 सदस्य (जनतेतून निवडून आलेले 543 सदस्य आणि राष्ट्रपतींद्वारे नामांकित अँग्लो-इंडियन दोन सदस्य) आणि राज्यसभेत 245 सदस्य आहेत.

नवी दिल्ली : मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून म्हणजेच 2014 सालापासून खासदारांच्या पगार आणि सुविधांवर मोठा खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. गेल्या चार वर्षात खासदारांच्या पगार आणि इतर भत्त्यांसाठी सरकारी तिजोरीतून तब्बल 1 हजार 997 कोटी रुपये खर्च झालेत. आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारातून यासंदर्भात माहिती मिळवलीय. लोकसभा सचिवलयाने चंद्रशेखर गौड यांच्या अर्जाला उत्तरात म्हटलंय की, लोकसभेच्या एका सदस्यांसाठी सरासरी 71.29 लाख रुपये खर्च केला गेला, तर राज्यसभेच्या एका सदस्यासाठी सरासरी 44.33 लाख रुपये खर्च केला गेला. लोकसभेत एकूण 545 सदस्य (जनतेतून निवडून आलेले 543 सदस्य आणि राष्ट्रपतींद्वारे नामांकित अँग्लो-इंडियन दोन सदस्य) आणि राज्यसभेत 245 सदस्य आहेत. 2014-15 सालापासून यावर्षीपर्यंत म्हणजेच चार आर्थिक वर्षात लोकसभा सदस्यांना पगार आणि भत्त्यांसाठी 1 हजार 554 कोटी रुपये देण्यात आले. म्हणजेच, प्रत्येक सदस्याला सरासरी 71 लाख 29 हजार 390 रुपये देण्यात आले. याच काळात राज्यसभा सदस्यांच्या पगार आणि भत्त्यांसाठी 443 कोटी रुपये खर्च करण्यात आले.  म्हणजेच, प्रत्येक सदस्याला 44 लाख 33 हजार 682 रुपये देण्यात आले. खासदारांच्या पगार आणि सुविधांवर होणाऱ्या खर्चाची आकडेवारी पाहून, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मचे संस्थापक सदस्य जगीश छोकर म्हणाले की, "खासदारांच्या पगार सुविधांवर होणाऱ्या खर्चाचं सरकारी तिजोरीवर वाढणारं ओझं लक्षात घेता, यावर विचार व्हायला हवा. खासदारांचा पगार आणखी 10 टक्क्यांनी वाढला, तरी काहीच हरकत नाही. मात्र, सरकारी परिवहन, घर, वाहन, भोजन, हवाई प्रवास, टेलिफोन आणि तर गोष्टींचे भत्ते मिळायला नकोत." दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या या माहितीवर अद्याप कुठल्याही खासदाराने प्रतिक्रिया दिली नाहीय. आता खासदारांची प्रतिक्रिया काय आहे, हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget