एक्स्प्लोर

मुंबईतलं पिण्याचं पाणी सर्वात शुद्ध, तर दिल्लीतील पाणी सर्वात अशुद्ध

पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेबाबत देशभरातून खास करुन देशाची राजधानी दिल्लीतून अधिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत बीआयएसने (द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड) पडताळणी केली.

मुंबई : देशभरातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत नेहमी चर्चा होत असते. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत अनेकदा शंका व्यक्त केली जाते. मात्र मुंबईतील पाणी पिण्यासाठी सर्वात शुद्ध असल्याचं विविध चाचण्यांमध्ये सिद्ध झालं आहे. पिण्याच्या पाण्याबाबत इंडियन स्टँडर्ड ब्युरोकडून करण्यात आलेल्या चाचणीनंतर मुंबईतील पाणी हे 20 शहरांच्या रँकिंगमध्ये शुद्धतेच्या तुलनेत अव्वल क्रमांकावर आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचं पाणी पिण्यासाठी आधिक योग्य असल्याचं रँकिंगमध्ये समोर आलं आहे.

देशभरातून पिण्याच्या पाण्याच्या समस्या समोर येत असताना द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (BIS) ने प्रमुख 20 शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चाचणी करण्याचं ठरवलं. या शहरांमधील पाण्याच्या चाचण्याचा अहवाल आता समोर आला आहे. याबाबत आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेबाबत देशभरातून खास करुन देशाची राजधानी दिल्लीतून अधिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत बीआयएसने पडताळणी केली. विविध 10 निकषांवर ही पडताळणी करण्यात आली. यामध्ये देशातील विविध 20 राज्यांचा राजधानींचा यामध्ये समावेश होता. गांधीनगर, मुंबई, दिल्ली, पाटणा, कोलकाता, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांचा यामध्ये समावेश होता. जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व भारत सोडून महत्वाच्या सर्वच शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची पडताळणी करण्यात आली.

यामध्ये मुंबईत सर्वात शुद्ध पाणी नळाद्वारे येत असल्याच अहवालात समोर आलं आहे. तर विकसित राज्य असलेल्या गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नळाद्वारे येत असलेलं पाणीही अशुद्ध असल्याचे समोर आलं आहे. त्या खालोखाल पाटणामध्ये उपलब्ध असलेलं मातीमिश्रित पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. देशात प्रत्येक घरात 2024 पर्यत पिण्याच्या नळाद्वारे शुद्ध , स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

शुद्ध पाण्याच्या बाबतीत कुठलं शहर कोणत्या स्थानावर?

1. मुंबई 2 हैदराबाद 3. भुवनेश्वर 4. रांची 5. रायपूर 6. अमरावती 7. शिमला 8. चंदीगढ 9. त्रिवेंद्रम 10. पाटणा 11. भोपाळ 12. गुवाहाटी 13. बंगळुरु 14. गांधीनगर 15. लखनौ 16 जम्मू 17. जयपूर 18. देहरादून 19. चेन्नई 20. कोलकाता 21. दिल्ली

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget