Goodle Doodle : भारतीय महिला आज पारंपरिक मर्यादांच्या बेड्या तोडून अवकाशात झेप घेताना दिसत आहेत. सरला ठकराल यांनी सुमारे 85 वर्षांपूर्वी जिप्सी मॉथ नावाच्या विमानाचे उड्डान करुन देशातील पहिली महिला वैमानिक (India’s First Woman Pilot) होण्याचा मान मिळवला. त्यांची आज 107 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने भारतीय महिलांसाठी आदर्श असणाऱ्या सरला ठकराल यांना गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे.
सरला ठकराल यांचा जन्म 8 ऑगस्ट 1914 साली दिल्ली येथे झाला. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचा विवाह वैमानिक असलेल्या पीडी शर्मा यांच्या सोबत झाला. सरला ठकराल यांनी आपल्या पतीच्या प्रोत्साहानामुळे जोधपूर फ्लाईंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि वयाच्या 21 व्या वर्षी, 1936 साली त्यांनी लाहोर येथे जिप्सी मॉथ नावाच्या दोन सीटर विमानाचे यशस्वी उड्डान केलं.
आजपासून सुमारे 85 वर्षांपूर्वी, भारतीय महिलांना परंपरेच्या नावाने जोखडाखाली अडकवलं असताना सरला ठकराल यांनी भारतीय महिलांना अवकाशात झेप घ्यायाची प्रेरणा दिली. भारतात त्यावेळी ब्रिटिश राज होते. सरला ठकराल यांनी विमानाचे उड्डान केलं त्यावेळी त्यांनी चार वर्षाची मुलगी होती.
सुरुवातीला प्रशिक्षण घेतल्यानंतर सरला ठकराल यांनी 1000 तासांचे विमान उड्डान करुन 'A'कॅटेगरीमधील लायसन्स प्राप्त करण्यात यश मिळवलं. महत्वाचं म्हणजे सरला ठकराल यांना वैमानिक होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने किंवा मित्र परिवाराने कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे त्यांचा अवकाशात झेप घेण्याचा मार्ग सुकर बनला.
पतीचा विमान दुर्घटनेत मृत्यू
सरला ठकराल यांचे पती वैमानिक होते, पण दुर्दैवाने त्यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर 1939 साली दुसरे जागतिक महायुद्ध सुरु झाल्याने कमर्शियल पायलट व्हायचं स्वप्न सरला ठकराल यांनी गुंडाळावं लागलं. त्यानंतर सरला ठकराल यांनी लाहोरच्या मेयो स्कुल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला आणि फाईन आर्ट आणि चित्रकलेचं अध्ययन केलं.
संबंधित बातम्या :
- Google Doodle : स्त्री मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या कादंबरी गांगुलीना गुगल डूडलचा सलाम
- Google Doodle : समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या Frank Kameny यांना गुगलची डूडलच्या माध्यमातून मानवंदना
- Earth Day 2021 | उज्ज्वल भवितव्यासाठी बीज रोपण करा, जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने गुगल-डुडलचा संदेश