Earth Day 2021 : आज जगभर जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने गुगलने डुडलच्या माध्यमातून एक अनोखा संदेश दिला आहे. पृथ्वीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येकाने एक बीज रोपण करा असा संदेश गुगलने दिला आहे. दरवर्षी जागतिक वसुंधरा दिवस साजरा करताना एक थीम तयार करण्यात येते. या वर्षीची थीम आहे 'रिस्टोअर अवर अर्थ'.


दर वर्षी 22 एप्रिलला हा दिवस जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. या दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण आणि सजीवांच्या जीवनात असलेले पृथ्वीचे महत्व या विषयांवर जागरुकता निर्माण केली जाते. तसेस विशेषकरून, लहान मुलांमध्ये या दिवसाबद्दल जागरुकता करण्यात येते. 


 




का साजरा केला जातो वसुंधरा दिवस?
सजीवांच्या जीवनात पृथ्वी अर्थात वसुंधराचे योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे या पृथ्वीचे आणि त्यावरील पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच त्याच्या महत्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 1970 सालापासून जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. आज जगातील 192 पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातोय. सध्या जगासमोर ग्लोबल वॉर्मिंग, प्रदुषण आणि पर्यावरणासंबंधी इतर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करणे, पर्यावरणाची गुणवत्ता टिकवून ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 


अमेरिकेन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या दिवसाची कल्पना मांडली होती. त्यांच्या या कल्पनेला जगभरातून मान्यता मिळाली आणि 1970 साली पहिल्यांदा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. 


जगभरातील नैसर्गिक साधन संपत्तीचे विकासाच्या नावाखाली शोषण केलं जात आहे. गेल्या 50 वर्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पृथ्वीवरच्या साधनसंपत्तीचा समतोल बिघडत असून त्याचा परिणाम हा जागतिक तापमानात वाढ, प्रदुषण तसेच इतर अनेक घटकांच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या पीढीने याचे महत्व समजून घेऊन शाश्वत विकासाकडे पाऊल टाकले पाहिजे. यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. 


दरवर्षी हा दिवस उत्साहाने साजरा केला जातोय. पण या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता वसुंधरा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याला मर्यादा आल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या :