एक्स्प्लोर
Advertisement
गोव्याच्या वीजमंत्र्यांना ब्रेनस्ट्रोक, मुंबईत शस्त्रक्रिया
आरोग्यमंत्री राणे आता मडकईकर यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. राणे यांच्यासोबत गोवा मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक गेले असून ते मडकईकर यांच्यावर केल्या जात असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवणार आहेत.
गोवा : वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेनस्ट्रोक आला असून त्यांच्यावर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मडकईकर यांची प्रकृती स्थिर असून आपण त्यांना पहायला मुंबई येथे जात असल्याची माहीती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.
मडकईकर काल कामानिमित्त मुंबईमध्ये गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीमध्ये मडकईकर यांना ब्रेनस्ट्रोक आल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सूत्रांनी कळवले आहे.
आरोग्यमंत्री राणे आता मडकईकर यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. राणे यांच्यासोबत गोवा मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक गेले असून ते मडकईकर यांच्यावर केल्या जात असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवणार आहेत.
जुने गोवे येथील आलीशान बंगला आणि सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे मडकईकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पणजीत रविवारी दिवसभर लाईट नसल्याची तक्रार अमेरिकेत उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यापर्यंत पोहोचल्या तर त्यांनी त्याची गंभीर दखल घेत वीज खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेऊन त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र काल मध्यरात्री मडकईकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांची समिती राज्याचा कारभार हाकत होती. त्यातील नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा हे कालच खाजगी दौऱ्यावर 20 दिवसांसाठी पोर्तुगालला गेले आहेत. आता वीजमंत्री असलेल्या मडकईकर यांना ब्रेनस्ट्रोक आल्याने भाजप आघाडी सरकार समोरील पेच आणखी वाढला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement