एक्स्प्लोर

मनोहर पर्रीकरांच्या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद

गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पणजी : गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली. मिरामार येथे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मारकाशेजारी पर्रीकर यांचे स्मारक बांधण्याचा संकल्प सरकारने केला होता. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद आताच करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनीही हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा सरकार जर पर्रीकर यांच्या स्मारकाचे काम लवकर सुरू करणार नसेल तर लोकसहभागामधून स्मारक बांधून घेऊ, असा इशारा सरकारला दिला होता. त्यावर स्मारक सरकारच बांधेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता स्मारकासाठी अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली आहे. 450 कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प विधानसभेत सादर रोजगार निर्मिती, कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर देणारा गोव्याचा 450 कोटी रुपयांचा शिलकी (अतिरिक्त महसूल ) अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. मनोहर पर्रीकर यांनी शेवटच्या अधिवेशनात मुख्यमंत्रीपदी असताना अर्थसंकल्प पटलावर ठेवला होता. आजारपणामुळे त्यावेळी त्यांचे भाषण झाले नव्हते. आज मुख्यमंत्री सावंत यांनी तेच भाषण वाचून दाखवले. मात्र काळानुरुप त्यात काही बदल केले गेले आहेत. अर्थसंकल्पातील आकडेवारी मात्र जुनीच आहे. मिरामार येथे स्वर्गीय पर्रीकर यांचे स्मारक बांधण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 19 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतुद असलेला हा अर्थसंकल्प आहे. यात दहा टक्के विकास दर अपेक्षित धरण्यात आला आहे. येत्या तीन वर्षात सरकारी व खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. एक खिडकी योजना अस्तित्वात आणल्यानंतर राज्यात गुंतवणूक वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्राथमिक स्तरापासून विद्यापीठ स्तरापर्यंतच्या शिक्षणाच्या दर्जात सुधारणा केली जाईल. तांत्रिक शिक्षणाचा अभ्यासक्रम दुरुस्त केला जाईल. सागरमाला योजनेअंतर्गत राज्यातील नऊ जेट्टींचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. राज्याचे पर्यटन केवळ किनारपट्टीपुरतेच मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही नेले जाईल. पर्यटकांना स्वयंपाक करण्यास, कपडे बदलण्यास, शौचास जाण्यासारखे विधी पार पाडण्यास आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. खासगी क्षेत्राच्या सहभागाने अशा सुविधा आऊटसोर्स केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. वाहतूक भवन बांधणे, पाटो-पणजी व डिचोलीत सर्व सरकारी कार्यालयांसाठी प्रशासकीय प्रकल्प, जायकाची कामे 2020 पर्यंत पूर्ण करणे, मलनिःस्सारण व्यवस्थेचे जाळे राज्यभर पसरवणे आणि गोव्याला 31 ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करणे, अशी विविध उद्दीष्टे सरकारने समोर ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget