एक्स्प्लोर

मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्करप्रमुख म्हणून सूत्रं स्वीकारली

नवे लष्करप्रमुख म्हणून मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे लष्कराची जबाबदारी असणार आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मनोज नरवणे यांची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज जबाबदारी स्वीकारली आहे. नरवणे यांच्या रुपाने मराठी व्यक्ती देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान झाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत हे आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्याजागी नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवे लष्करप्रमुख म्हणून मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे लष्कराची जबाबदारी असणार आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मनोज नरवणे यांची निवड करण्यात आली आहे. नरवणे हे देशाचे 28 वे लष्करप्रमुख आहेत. नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मनोज नरवणे यांच्या रुपाने जवळपास 33 वर्षानंतर मराठी माणसाकडे पुन्हा एकदा लष्कराचे नेतृत्व आलं आहे. 13 लाख अधिकाऱ्यांचा फौजफाटा असणाऱ्या लष्कराचे प्रमुख म्हणून आता लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे काम पाहणार आहेत.

बिपीन रावत भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'

बिपीन रावत यांची लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात सीडीएस म्हणून नियुक्तीची घोषणा सोमवारी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची सूत्रं स्वीकारण्याआधी बिपीन रावत यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून तिन्ही दलात समन्वय राखण्याची जबाबदारी बिपीन रावत यांच्याकडे असणार आहे.

नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची ओळख

मनोज नरवणे यांचं सुरुवातीचं शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेतून झालं. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतल्यानंतर 1980 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतलं. शीख लाईट इन्फंट्रीमध्ये जून 1980 मध्ये त्यांनी सुरुवातीला काम केले. लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी 'आसाम रायफल्स'चे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. म्यानमारमध्ये त्यांनी भारताचे डिफेन्स अटॅची म्हणून काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी लष्कर प्रशिक्षण कमांडच्या प्रमुखपदावरुन कोलकातामधील पूर्व कमांडच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget