एक्स्प्लोर

Asia's richest Business Man: ...तर संपत्तीच्या बाबतीत अंबानींना मागे सारत गौतम अदानी होतील आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! 

अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ कायम राहिल्यास  भारताचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी लवकरच मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यावर मात करत आशियातील सर्वात श्रीमंत ठरु शकतात.

मुंबई : जगभरात कोरोनामुळे मंदी आली असताना, भारताची अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत मात्र अनेक पटींनी वाढ होत असल्याचं समोर येत आहे. अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ कायम राहिल्यास  भारताचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी लवकरच मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यावर मात करत आशियातील सर्वात श्रीमंत ठरु शकतात. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) च्या मते,  आज बुधवारपर्यंत 68.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत 15 व्या क्रमांकावर आले आहेत आशियातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी 75.8 अब्ज डॉलर्सच्या वैयक्तिक संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आहेत.

अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत मागील आठवड्यात चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकलं आहे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. जगाचा विचार करता ते श्रीमंतांच्या यादीत 15 व्या स्थानी आले आहेत.  

Bloomberg Billionaires Index च्या मते, अदानी यांच्या संपत्तीत वाढ होऊन ती आता 68.4 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. या एकाच वर्षात अदानी यांच्या संपत्तीत 34.76 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यांच्यापुढे मुकेश अंबानी असून त्यांची संपत्ती ही 75.8  बिलियन डॉलर इतकी आहे. चीनच्या शानशान यांची संपत्ती 63.6 बिलियन डॉलर इतकी आहे.  अदानी यांच्या संपत्तीचा वाढता दर पाहता लवकरच ते अंबानी यांना मागे टाकतील असं सांगण्यात येतंय. 

फेब्रुवारी महिन्यात रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी चीनच्या शानशान यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला होता. या वर्षी अदानी ग्रीन, अदानी एन्टरप्रायझेस, अदानी गॅस , अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही वर्षापासून अदानी हे जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या उद्योगाचा यशस्वी विस्तार करताना दिसत आहे.  

अमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ही 188 बिलियन डॉलरच्या वर आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget