(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Forbes Billionaire List : फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर, बिल गेट्सना मागे टाकले
Forbes Billionaire List : फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे ( Microsoft) संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून चौथ्या स्थानावर स्थान पटकावले आहे
Forbes Billionaire List : अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी (Adani Group) जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आले आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे ( Microsoft) संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. दरम्यान, बिल गेट्स यांनी घोषणा केली होती की, ते त्यांच्या संपत्तीतून $ 20 अब्ज दान करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ते 102 अब्ज डॉलर्स संपत्ती असलेल्या श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थानावरून पाचव्या स्थानावर आले आहेत. तर गौतम अदानी 114 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.
गौतम अदानी चौथ्या स्थानावर
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार गौतम अदानी चौथ्या स्थानावर आहेत. पण त्याच्या पुढे पहिल्या तीन स्थानांवर असलेल्या लोकांमध्ये टेस्लाचे एलोन मस्क यांचा समावेश आहे, जे $230 अब्ज संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. तर लुई व्हिटॉनचे बर्नार्ड ऑरनॉल्ट दुसऱ्या स्थानावर, अॅमेझॉनचे जेफ बेझोस तिसऱ्या स्थानावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 88 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर लिस्टनुसार, पहिल्या चार श्रीमंतांमध्ये गौतम अदानी यांनी $2.3 बिलियनची सर्वाधिक संपत्ती जोडली आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत $1.5 बिलियनची भर पडली आहे.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत $1.5 बिलियनची भर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 88 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर लिस्टनुसार, पहिल्या चार श्रीमंतांमध्ये गौतम अदानी यांनी $2.3 बिलियनची सर्वाधिक संपत्ती आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत $1.5 बिलियनची भर पडली आहे.