एक्स्प्लोर
विजय रुपाणींचा आज शपथविधी, 6 पाटीदार नेत्यांसह 20 जण कॅबिनेटमध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजप आणि एनडीए घटक पक्षांमधील 18 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
गांधीनगर : विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा आज शपथविधी होणार आहे. विजय रुपाणी आज दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची वर्णी लागली आहे. रुपाणी यांच्यासोबत 20 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतील.
गांधीनगरमध्ये भव्य सोहळा
गांधीनगरमधील सचिवालय इमारतीशेजारील पटांगणावर हा भव्य सोहळा होणार आहे. राज्यपाल ओ. पी. कोहली त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासमा,कौशिक पटेल, सौरभ पटेल, जयेश राधडिया, गणपत वसावा यांच्यासह अनेकांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजप आणि एनडीए घटक पक्षांमधील 18 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
कोणाचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो?
मुख्यमंत्री - विजय रुपाणी
उपमुख्यमंत्री - नितीन पटेल
माजी प्रदेशाध्यक्ष - गणपत वसावा
माजी गृहराज्यमंत्री - प्रदीप सिंह जाडेजा
भूपेंद्र सिंह चुडासमा - धोलका मतदारसंघ
कौशिक पटेल -नारायणपुरा मतदारसंघ
सौरभ पटेल - बोटाद मतदारसंघ
जयेश राधडिया - जेतपुर मतदारसंघ
आरसी फल्दु - जामनगर मतदारसंघ
दिलीप ठाकोर - चाणस्मा मतदारसंघ
वासणभाई अहीर - अंजार मतदारसंघ
पुरुषोत्तम सोलंकी - भावनगर ग्रामीण मतदारसंघ
विभावरीबेन दवे - भावनगर
बचूभाई खाबड -देवगड बारिया मतदारसंघ
ईश्वर पटेल - अंकलेश्वर मतदारसंघ
कुमार कानाणी - वराछा मतदारसंघ
ईश्वर परमार - बारडोली मतदारसंघ
रमण पाटकर - उमरगाव मतदारसंघ
जयद्रथ सिंह परमार - हालोल मतदारसंघ
परबत पटेल - थराड मतदारसंघ
विजय रुपाणी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री, आमदारांच्या बैठकीत निर्णय
सहाव्यांदा विजय, पण 16 जागा कमी
गुजरातमध्ये भाजपने सलग सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला 16 जागा कमी मिळाल्या आहेत. भाजपने 2012 मध्ये 115 जागा मिळवल्या होत्या. तर दुसरीकडे विरोधकांच्या जागांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. 2012 मध्ये काँग्रेसला 61 जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा 77 जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं आहे. स्थानिक पक्षांसोबत हातमिळवणी करत काँग्रेसच्या जागा 81 वर पोहोचल्या आहेत.
भाजप, काँग्रेसची एक-एक जागा वाढली
नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. एका अपक्ष आमदारानेही भाजपला पाठिंबा दिल्याने हा आकडा आता 100 झाला आहे. तर काँग्रेस आणि समर्थक आमदारांची संख्या 81 वर पोहोचली आहे. एका अपक्ष आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हा काँग्रेसचा आकडा 80 वरुन 81 वर गेला आहे.
गुजरात विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजप (99) +अपक्ष (1) = 100
काँग्रेस (77) + बीटीपी (2) + अपक्ष (2) = 81
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
एकूण = 182
संबंधित बातम्या :
सत्ता आली, पण मोदींच्या जन्मगावात भाजपचा पराभव
पुढच्या वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेशसह या 8 राज्यात निवडणुका
देशातील 29 पैकी 19 राज्यात भाजप-एनडीएची सत्ता
गुजरात, हिमाचलनंतर सर्वांची नजर आता कर्नाटकवर
हा विजय विकासाचा, देश बदलासाठी तयार : मोदी
गुजरात : काँग्रेसची मतांची टक्केवारी 10 टक्क्यांनी वाढली
गुजरातमध्ये सत्ता राखली, हिमाचलमध्ये सत्ता बदलली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement