एक्स्प्लोर

Gandhinagar Railway Station : एअरपोर्टसारखं दिसणाऱ्या गांधीनगर रेल्वे स्टेशनचं आज उद्घाटन, काय आहे खासियत

Gandhinagar Railway Station :  गुजरातच्या गांधीनगरमध्ये पुनर्विकसित केलेल्या रेल्वेस्टेशनसह अन्य काही विकासकामांचं उद्घाटन आज पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते व्हर्चुअली होणार आहे.

Gandhinagar Railway Station :  गुजरातच्या गांधीनगरमध्ये पुनर्विकसित केलेल्या रेल्वेस्टेशनसह अन्य काही विकासकामांचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हर्चुअली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. मोदींच्या हस्ते गुजरातमध्ये रेल्वेच्या काही महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन होईल तसंच ‘अॅक्वाटिक्स अॅन्ड रोबॉटिक्स गॅलरी’ आणि गुजरात सायंस सिटीमधील ‘नेचर पार्क’ देखील लोकार्पित केलं जाणार आहे. 

पंतप्रधान मोदी आज पुनर्विकसित गांधीनगर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या वर बनवलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलचं व्हर्चुअली उद्घाटन करतील. तसेच पंतप्रधान मोदी गांधीनगर राजधानी-वाराणसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गांधीनगर राजधानी- वरेठा दरम्यान एमईएमयू या दोन नवीन ट्रेन्सला हिरवा झेंडा देखील दाखवतील. 

पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार गांधीनगर राजधानी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी 71 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आधुनिक सुविधांसह एअरपोर्टसारख्या सुविधा या रेल्वे स्टेशनवर पुरवण्यात येणार आहेत.  

गांधीनगर कॅपिटल पहिला स्टेशन आहे जिथं स्टेशनवर फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. स्टेशनवर आल्यानंतर प्रवाशांना विमानतळावर आल्याचीच भावना निर्माण होईल अशी याची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो.  

गांधीनगर राजधानी रेल्वे स्टेशनमधील विशेष गोष्टी 

  • दिव्यांग व्यक्तिंसाठी एक विशेष तिकिट खिडकी, रॅम्प, सुरक्षित पार्किंग व्यवस्था
  • संपूर्ण इमारतीला  हरित भवनच्या स्वरुपात डिझाईन केलं आहे. 
  • स्टेशनवर अत्याधुनिक थीमवर आधारित लायटिंगची व्यवस्था केली आहे. ज्यात  32 थीम आहेत. 
  •  स्टेशन परिसरात  फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये 318 खोल्या आहेत. 
  • अत्याधुनिक अॅक्वाटिक गॅलरीच्या टॅंकमध्ये जगभरातील विविध प्रजातींचे जलचर प्राणी असतील.  
  • गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशन आणि हॉटेलमध्ये सामाजिक तसेच पारिवारिक समारंभांच्या आयोजनासाठी वातानुकूलित हॉल आणि 1100 मीटर ओपन स्पेस ठेवण्यात आला आहे. 
  • स्टेशनवर तीन प्लॅटफार्म, दोन एस्कलेटर्स, तीन एलिव्हेटर व दोन प्रवाशी सबवे बनवण्यात आले आहेत. 
  • सोबतच आठ आर्ट गॅलरी आहेत ज्यामध्ये  गुजरातच्या ऐतिहासिक स्थळांची आणि लोककलांची माहिती देणारं प्रदर्शन असेल.  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Leopard attack Ganesh Naik: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
Embed widget