एक्स्प्लोर
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, राजौरीमध्ये 4 जवान जखमी
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या राजौरी भागात पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. रविवारी रात्री पाकिस्तानकडून भारतीय सीमेलगत वारंवार गोळीबार सुरु होता. या गोळीबारात 4 जवान जखमी झाले आहेत.
गेल्या 24 तासात पाकिस्ताननं 3 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देण्यात आलं आहे. दरम्यान पाकिस्तानकडून काश्मीरच्या नौशेरा आणि सुंदरबनी भागात शनिवारपासून गोळीबार सुरु आहे. यात बीएसएफचा एक जवान आणि एक महिला जखमी झाली आहे. तसंच दोन घरांची पडझड झाली आहे.
मागच्या आठवड्यात पाकिस्ताननं जम्मूच्या पल्लनवाला सेक्टरमध्ये सीमेलगतच्या गावांना लक्ष्य केलं होतं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून 286 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यात 14 जवानांसहित 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement