एक्स्प्लोर
गोव्यात काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर, कुंकळ्ळीच्या काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट
मतदारसंघाच्या विकासासाठी हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असं डायस समर्थकांना सांगितलं.

पणजी : काँगेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गोव्यात सुरु आहे. त्यातच काँग्रेस पक्षाचे कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफासियो डायस यांनी काँग्रेसचे चार आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली आहे. आपण विरोधी पक्षात असल्याने कुंकळ्ळीच्या बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या पुरवू शकत नाही. त्यामुळे समर्थकांनी पाठिंबा दिल्यास, आपण सुद्धा भाजपात प्रवेश करण्यास तयार आहे, असं आमदार डायस यांनी स्पष्ट केलं आहे.
कुंकळ्ळी येथे काल सायंकाळी उशिरा डायस यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. या सभेत त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सहकारी उपस्थित होते. काँग्रेसचे चार आमदार त्यांच्या मतदारसंघात होत नसलेल्या विकास कामांमुळे अस्वस्थ आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असं डायस समर्थकांना सांगितलं. आपल्या समर्थकांना आपण काँग्रेस पक्ष सोडालेला नको असल्यास आपण त्यांच्या मर्जीबाहेर जाणार नाही असे डायस स्पष्ट केले आहे. सुमारे 200 कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी डायस यांनी भाजपात प्रवेश करु नये, असं मत व्यक्त केलं. तर काहींनी विकासासाठी हा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं.
कुंकळ्ळी मतदारसंघात सध्या आपण काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार अशा अफवा उठलेल्या आहेत. अजून तरी आपल्याला भाजपची ऑफर आलेली नाही. पण विरोधात असल्याने आपणाला बेरोजगार युवकांना सरकारी नोकऱ्या मिळवून देणे शक्य नाही. आमचे चार आमदार काँग्रेसचा त्याग करण्याच्या वाटेवर आहेत. आपल्याला लोकांनी परवानगी दिल्यास आपण त्यांच्याबरोबर काँग्रेस सोडण्यास तयार आहे, असं डायस म्हणाले. पत्रकारांनी डायस यांना विचारले असता भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा समर्थकांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
