एक्स्प्लोर

'सोहराबुद्दीन केसमधून वरिष्ठ अधिकारी, नेते कसे सुटले?'

हायप्रोफाईल दोषींची सुटका, तडकाफडकी झालेल्या बदली, जामिनासंबंधीचे प्रश्न आणि साक्षीदारांवर साक्ष फिरवण्यासाठी असलेला दबाव या बाबींवर माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी प्रकाशझोत टाकला.

मुंबई : सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केसमधील सगळ्या हायप्रोफाईल कैद्यांना जामीन कसा मिळाला? असा सवाल माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्राला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत विचारला आहे. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी राजकीय दबाव, न्यायव्यवस्थेची अडचण आणि सोहराबुद्दीन खटल्यातील गंभीर वस्तुस्थिती या मुलाखतीतून आधोरेखित केली आहे. सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक केसमधील सगळ्या हायप्रोफाईल कैद्यांना जामीन कसा मिळाला? त्यात फक्त कनिष्ठ अधिकारीच कसे अडकले? प्रथमदर्शनी गुजरातचे माजी पोलिस उपमहानिरीक्षक डी. जी. वंजारा, आयपीएस राजकुमार पांडियन आणि राजस्थान केडरचे दिनेश एम. एन यांचा केसमधील सहभाग स्पष्टपणे जाणवत असतानाही त्यांची सुटका कशी झाली? असे प्रश्न माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी उपस्थित केले आहेत. खटल्याशी संबंधित सर्व निर्णयांचा मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा, असा सल्लाही अभय ठिपसे यांनी दिला आहे. ठिपसेंची स्फोटक आणि विस्तृत मुलाखत बुधवारच्या 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्रात छापून आली आहे. हायप्रोफाईल दोषींची सुटका, तडकाफडकी झालेल्या बदली, जामिनासंबंधीचे प्रश्न आणि साक्षीदारांवर साक्ष फिरवण्यासाठी असलेला दबाव या बाबींवर ठिपसेंनी प्रकाशझोत टाकला. मार्च 2017 अलाहाबाद हायकोर्टाचे जज म्हणून निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या केसवर भाष्य केलं आहे. डी. जी. वंजारा यांना जामीन देण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती, मात्र सुप्रीम कोर्टानं इतर दोन अधिकाऱ्यांना जामीन मंजूर केल्यामुळे केवळ वरच्या कोर्टाचा मान राखण्यासाठी आपण जामीन मंजूर केला, असा दावा अभय ठिपसे यांनी केला. मात्र ऑर्डर पास करताना त्यात सगळ्या निरीक्षणांची नोंद केल्याचंही माजी न्यायमूर्ती ठिपसे यांनी म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टातील सुनावणीत स्पेशल सीबीआय कोर्टाने पास केलेल्या ऑर्डरमध्ये विचित्र विसंगती असल्याचंही ठिपसे म्हणाले. मुंबई हायकोर्टाने पुनर्निर्णयाच्या अधिकाराचा वापर करावा, गरज पडल्यास स्यू मोटो दाखल करुन या केसमध्ये पुन्हा लक्ष घालावं, असंही अभय ठिपसेंनी मुलाखतीतून सुचवलं आहे. चकमकीत मारले गेलेल्यांची धरपकड करुन चकमक तयार करण्यात आली, असं कोर्टालाही वाटतं, मात्र तरीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली. या केसमधील काही पैलू संशयास्पद आहेत, तर काही कॉमन सेन्सलाही काट मारणारे असल्याचा दावा ठिपसेंनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget