एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राफेलची किती आवश्यकता आहे हे जाणवतंय, देशाच्या माजी हवाई दल प्रमुखांचं कारवाईनंतर मत
सोबतच ही कारवाई झाली म्हणजे सगळं झालं असं नाही. चीन, पाकिस्तानच्या हालचाली बघून आपण तयार राहिले पाहिजे, असेही टिपणीस यांनी सांगितले.
नवी दिल्ली : वायुसेना, तुम्ही आपलं ध्येयवाक्य सिद्ध करून दाखवलं, कारवाईची बातमी समजल्यावर पहिल्यांदा मनात हाच विचार आला, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांनी दिली आहे. या कारवाईनंतर राफेलची किती आवश्यकता आहे हे जाणवत आहे. राफेल 36 का आणले 126 का नाहीत? असे प्रश्न देशाने विचारायला पाहिजेत मात्र दुर्दैवाने आपल्याकडे दुसरा वाद सुरू आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सोबतच ही कारवाई झाली म्हणजे सगळं झालं असं नाही. चीन, पाकिस्तानच्या हालचाली बघून आपण तयार राहिले पाहिजे, असेही टिपणीस यांनी सांगितले.
एअर स्ट्राईकमुळे तुम्ही कुठून येता, तिथून कुठे जाऊ शकता, हे कळत नाही, हुलकावणी देऊ शकता. ही हवाईदलाच्या कारवाईची ताकद आहे. मीड एअर करेक्शन सुद्धा करू शकता, असे त्यांनी सांगितले. मिराज 2000 मल्टीपर्पज एअरक्राफ्ट आहे. ते त्याचं टारगेट ऐनवेळी बदलू शकतं. हे स्मार्ट वेपन पैकी एक आहे. तुमचा निशाणा योग्य नसेल तरीसुद्धा तुम्ही टारगेट उडवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
या हल्ल्यात लेझर गाइडेड बॉम्ब वापरले. यामुळे विमानांची दिशा बदलली तरी सुद्धा टारगेट कायम राहतं. विमान 120 डिग्रीत वळली तरी लेझर टार्गेट लॉक करतात, असे त्यांनी सांगितले. या फॉर्मेशन मधली सगळी विमानं टारगेट उध्वस्त करण्यासाठीच वापरले असतील असं नाही. काही विमाने काउंटर डिफेन्ससाठी, निगराणीसाठी सुद्धा वापरली जातात. ही ट्रेनिंग एक्झरसाईज चालू आहे की खरंच कारवाई याबाबत फसवणूक करण्यासाठी अशा फॉर्मेशनचा वापर केला जातो. त्यांच्या रडारला चकमा देण्याचं काम काही विमाने करतात, असेही टिपणीस यांनी सांगितले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला जोरदार तडाखा
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या एअर स्ट्राईकने भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या कारवाईत भारताने आपल्या मिराज-2000 या विमानांचा वापर केला आहे. मिराज-2000 विमान शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या विमानांद्वारे एका तडाख्यात शत्रूंच्या अड्ड्यांना नेस्तनाबूत करून टाकण्याची शक्ती असते.
संबंधित बातम्या
भारताचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला, जैशचे अड्डे उध्वस्त
भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता
पुलवामाचा बदला : पाकिस्तान घाबरला, पाक सरकारने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली
'मिराज' ने पाकिस्तानला हादरवले, याआधीही पाकला पाणी पाजले होते, काय आहे मिराज -2000 विमान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
Advertisement