एक्स्प्लोर

वायनाडच्या जंगलत थरार; जवानांचा चमत्कार, गुहेमध्ये 5 दिवसांपासून अडकलेल्या चार मुलांची सुखरुप सुटका

आठ तासांच्या विशेष मोहिमेनंतर ही आदिवासी मुलं आणि त्यांच्या आईला सुरक्षित स्थळी आणण्यात आलं. या पाचही जणांची जगण्याची शक्यता धुसर असताना त्यांना वाचवून मदत कार्य करणाऱ्या जवानांनी एक चमत्कारच घडवला.

केरळ:  केरळातल्या वायनाड (Keral Wayanad Rain) जिल्ह्यात निसर्गाचा रुद्रावतार बघायला मिळाला. 4 गावं होत्याची नव्हती झाली. 300 हून अधिक लोकांचा बळी गेला असून आणखी 300 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मृत्युनं असं थैमान घातलं असताना अनेक रोमहर्षक आणि हृदयद्रावक घटना आता समोर येतायत. मदत पथकातल्या जवानांनी जीव पणाला लावून,घनदाट जंगलात एका गुहेमध्ये आसरा घेतलेल्या चार अल्पवयीन मुलांची सुटका केलीय. चार दिवसांपासून ही लेकरं अन्नपाण्यावाचून राहिली होती.

कालेपट्टा रेंजच्या जंगलात एक महिला या मुलांना अन्नपाणी मिळावं म्हणून  भटकत असल्याचं वनअधिकाऱ्यांच्या नजरेला पडलं होती. तिची विचारपूस केल्यानंतर त्या महिलेनं जवानांना गुहेमधील आपली चार मुलं दाखवली. 1 ते 4 वर्षे वयाची ही मुलं आहेत. 8 तासांच्या विशेष मोहिमेनंतर ही आदिवासी मुलं आणि त्यांच्या आईला सुरक्षित स्थळी आणण्यात आलं. या पाचही जणांची जगण्याची शक्यता धुसर असताना त्यांना वाचवून मदत कार्य करणाऱ्या जवानांनी एक चमत्कारच घडवला..

वायनाडच्या पानिया समुदायातील  हे कुटुंब डोंगरमाथ्यावरील एका गुहेत अडकले होते. त्या गुहेच्यावर खोल दरी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी टीमला साडेचार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पीटीआयशी बोलताना, हशीस यांनी सांगितले की,  गुरुवारी आई आणि चार वर्षांच्या मुलाला वनक्षेत्राजवळ भटकताना पाहिले.  मायलेकरांची चौकशी केल्यावर कळाले की  इतर तीन मुले आणि त्यांचे वडील अन्नाविना गुहेत अडकले आहेत.

कुटुंब अनेक दिवसांपासून  उपाशी

हशीस पुढे  सांगितले की, गुहेत अडकलेले हे कुटुंब आदिवासी समाजातील एका विशेष वर्गाशी संबंध ठेवतो.  सहसा या समाजातील इतर  लोकांशी संवाद टाळतात.  ते सामान्यतः वनातील उत्पदनांवर अवलंबून असतात. शेतातील तांदूळ  स्थानिक बाजारपेठेत विकून आपला उदरनिर्वाह करतात.  मात्र मुसळधार पाऊस आणि भूसख्लनामुळे बाहेर पडता  न आल्याने अनेक दिवसापासून उपाशी होते.  

गुहेजवळ गेल्यानंतर जवानांनी काय पाहिले?

 हशीस म्हणाले, ज्यावेळी आम्ही मोठ्या अथक प्रयत्नांनतर गुहेजवळ पोहचलो त्यावेळी आम्ही पाहिले  की मुले थकली होती. आम्ही आमच्याबरोबर जे काही अन्नपदार्थ घेतले होते ते आम्ही त्यांना दिले. नंतर खूप समजावून सांगितल्यावर, त्यांच्या वडिलांनी आमच्यासोबत यायला तयार केले. आम्ही मुलांना आमच्या अंगावर पट्टा बांधला आणि परतीचा प्रवास सुरू केला.

मुख्यमंत्र्यांनी केले जवानांचे कौतुक

अट्टमला येथील  स्थानिक कार्यालयात मुलांना जेव्हा जवान मुलांसह पोहचले त्यावेळी   मुलांना खायला दिले गेले आणि कपडे आणि बूट दिले गेले. सध्या त्यांना तिथे ठेवण्यात आले असून मुले सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोशल मीडियावर घेतले आणि वन अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक प्रयत्नांचे फोटो शेअर करत  केले.

हे ही वाचा :

Tamhini Ghat: मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट खचला, 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटनNarendra Modi Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात दाखल, दिग्गज नेत्यांची उपस्थितीदुपारी १ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PMSupreme Court Youtube Channel Hack : सुप्रीम कोर्टाचं यूट्युब चॅनल प्रायव्हेट कंपनीकडून हॅक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Embed widget