एक्स्प्लोर
लग्नात पाणीपुरी खाण्यावरुन वाद, हाणामारीत एकाचा मृत्यू
पाणीपुरी खाण्यासाठी वधू आणि वरपक्षातील मंडळींनी एकच घोळका केला. किरकोळ वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं आणि 50 जणांमध्ये मारामारी झाली
रांची : लग्नाच्या वेळी पाणीपुरी खाण्यावरुन वऱ्हाड्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे.
धनबादमधील बाघमारा गावात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न शेजारच्या गावातील तरुणाशी ठरलं होतं. लग्नाच्या निमित्ताने वरपक्षाकडून विविध खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. नवरदेव वरात घेऊन लग्नमंडपात दाखल झाला, त्याचवेळी पाणीपुरीचा स्टॉल घराजवळ लावण्यात आला.
पाणीपुरी खाण्यासाठी वधू आणि वरपक्षातील मंडळींनी एकच घोळका केला. आधी पाणीपुरी खाण्यासाठी नातेवाईकांमध्ये अहमहमिका लागली. किरकोळ वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. जवळपास 50 जणांमध्ये हमरीतुमरी झाल्याचं म्हटलं जातं. 'आज तक'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
हाणामारीमध्ये दिलीप दास यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. त्यानंतर चिडलेल्या जमावाने रास्तारोको करत तोडफोड केली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement