एक्स्प्लोर
फिफा अंडर-17 फुटबॉल विश्वचषकाचे 8 सामने नवी मुंबईत
नवी दिल्ली: फिफाचा अंडर-17 ज्युनियर फुटबॉल वर्ल्ड कप यंदा भारतात होत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचं बिगुल सरकार दरबारी आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल हे बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रातल्या फुटबॉलशौकिनांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकूण 24 सामन्यांपैकी 8 सामने हे नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत.
यामध्ये सेमीफायनलचाही समावेश आहे. याचनिमित्तानं देशाच्या क्रीडामंत्र्यांनी 'एबीपी माझा'शी खास बातचीत केली.
खेळ हा विषय राज्यसूचीतून आता समवर्ती सूचीत टाकण्याची तयारी सुरु असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. शिवाय 2020 च्या ऑलिम्पिकच्या निमित्तानं भारत सरकारची विशेष तयारी सुरु असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
विजय गोयल हे परवा डी वाय पाटील स्टेडियमचा पाहणी दौरा करणार आहेत,
शिवाय कांदिवलीतल्या SAI सेंटरसंदर्भात महत्वाच्या कराराबद्दल महाराष्ट्र सरकारची तेव्हा बोलणी होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement