Fake IPL: भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलचं वेड पाहायला मिळतं. आयपीएलच्या काळात भारतामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. अनेक ठिकाणी आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीही होते. याचदरम्यान, गुजरातच्या मेहसाणा (Mehsana) जिल्ह्यामधील वडनगर (Vadnagar) तालुक्यातील मोलीप गावात एका बनावट आयपीएल आयोजन करण्यात आलं. दरम्यान, बनावट लीगचं आयोजन करून बहाद्दरांनी रशियातील सट्टेबाजांना आपल्या जाळ्यात ओढलं. या बनावट लीगचं बिंग फुटलं असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी मेहसाणा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींविरोधात सट्टेबाजी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील एका आरोपीची शोध सुरू आहे, जो रशियात राहून संपूर्ण सट्टेबाजीचं रॅकेट चालवतो. बनावट आयपीएलच्या आयोजकांनी रशियातील ट्व्हर, व्होरोनेझ आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून सट्टेबाजीचा खेळ सुरू केला. सट्टेबाजांना वास्तवदर्शी वाटण्यासाठी आयोजकांनी 21 शेतमजूर आणि बेरोजगारांना आयपीएलच्या जर्सी देऊन क्रिकेटचे सामने खेळवले. त्यांना प्रतिसामना 400 रुपये दिले जात होते. एवढेच नव्हे तर, त्यांनी बनावट पंच आणि बनावट कामेंटेटर यांचंही आयोजन केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी वडनगरच्या मॉलीपूर गावात शेत खरेदी केलं. त्याचं क्रिकटेच्या मैदानात रुपांतर केलं. त्यानंतर मैदानात फ्लड लाईड लावण्यात आली. तसेच पिचही तयार करण्यात आली. मल्टी कॅम्प सेटअपसह, कॉमेंट्री बॉक्रसहीत प्रत्येक आवश्यक त्या गोष्टींची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय, एका मोबाईल अॅपवरही लाईव्ह सामने दाखवलं जात होतं.
हे देखील वाचा-
- Rohit Sharma Tweet: रोहित शर्माची भविष्यवाणी ठरतेय खरी, 10 वर्षापूर्वी सूर्यकुमारबाबत केलेलं ट्वीट होतंय व्हायरल
- IND vs ENG 3rd T20: रोहित शर्मानं सूर्यकुमारचं कौतूक तर केलंच! पण पराभवाचंही सांगितलं कारण
- ENG vs IND: 'विचार करूनच निर्णय घेतले जातात' विराटच्या खराब फॉर्मवर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया