Rohit Sharma's 10-year-old tweet on Suryakumar Yadav Goes Viral: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात शतक झळकावणारा भारताचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादवची  (Suryakumar Yadav) जोरदार चर्चा रंगली आहे. या कामगिरीसह येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात सूर्यकुमारची जागा जवळपास निश्चित मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) सूर्यकुमारबाबत केलेलं 10 वर्षांपूर्वीचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवनं 55 चेंडूत तुफानी फलंदाजी करत 117 धावा ठोकल्या. परंतु, तो भारताला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. या सामन्यानंतर रोहित शर्मानं सुर्यकुमारच्या फलंदाजीचं भरभरून कौतूक केलं. तसेच दिवसेंदिवस सूर्यकुमारच्या फलंदाजीत सुधारणा होत असल्याचंही रोहितनं म्हटलं. सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचं 10 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो म्हणाला होता की, “चेन्नईमध्ये बीसीसीआय पुरस्कारांची सांगता झाली. अनेक महान खेळाडू येथे आले. यात मुंबईचा सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे, जो भविष्यात चमकदार कामगिरी शकतो." या ट्विटवर आतापर्यंत 8 हजारांहून अधिक रीट्वीट केले गेले आहे. तर, जवळपास 25 हजार जणांनी या ट्वीटला लाईक्स केले. 


रोहित शर्माचं ट्वीट-



सूर्यकुमार यादवची चमकदार खेळी
इंग्लंडनं दिलेल्या 216 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या 2.4 षटकात 13 धावांत दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात आला. दरम्यान, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं संघाचा डाव सावरला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमारनं एक हाती झुंज दिली. परंतु, इतर फलंदाजांची त्याला साथ न मिळाल्यानं त्याची शतकी खेळी व्यर्थ गेली.


हे देखील वाचा-